चालू घडामोडी : २२ जुन 2021
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 22 JUNE 2021 | चालू घडामोडी : २२ जुन २०२१
चालू घडामोडी –
Q1] कोणत्या मंत्रालयाने ‘गंगा क्वेस्ट 2021’ या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर केला?
1) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
2) जलशक्ती मंत्रालय
3) ग्रामीण विकास मंत्रालय
4) पंचायतराज मंत्रालय
उत्तर :- ट्री क्रेझ फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) या संस्थेने ‘गंगा क्वेस्ट 2021’ ही ऑनलाइन प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित केली होती.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या दिवशी ‘जागतिक निर्वासित दिवस’ साजरा करतात?
1) 20 जून
2) 17 जून
3) 18 जून
4) 21 जून
उत्तर :- दरवर्षी 20 जून या दिवशी ‘जागतिक निर्वासित / शरणार्थी दिवस’ साजरा करतात. 2021 साली ‘जागतिक निर्वासित दिवस’ “टुगेदर वूई हील, लर्न अँड शाईन” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.
चालू घडामोडी –
Q3] कोणत्या व्यक्तीची ऑस्ट्रेलियाचे नवीन उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली?
1) मायकेल मॅक-कॉरमॅक
2) बार्नबी जॉयस
3) मॅल्कम टर्नबुल
4) पीटर डटन
उत्तर :- बार्नबी जॉयस हे ऑस्ट्रेलियाचे नवीन उपपंतप्रधान आहेत. ते 22 जून 2021 पासून पदाचा कार्यभार सांभाळणार.
चालू घडामोडी –
Q4] कोणती व्यक्ती जम्मू व काश्मीर प्रदेशातील राजौरी जिल्ह्यातून भारतीय हवाई दलात नियुक्त झालेली प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरली?
1) पी के नित्य
2) डॉ सयीद सेहरीश असगर
3) माव्या सुदान
4) यापैकी नाही
उत्तर :- माव्या सुदान ही जम्मू व काश्मीर प्रदेशातील राजौरी जिल्ह्यातून भारतीय हवाई दलात नियुक्त झालेली प्रथम महिला लढाऊ वैमानिक ठरली आहे.
चालू घडामोडी –
Q5] कोणत्या व्यक्तीची रेकिट बेन्कीझर (इंडिया) या कंपनीच्या प्रमुख पदावर नियुक्ती झाली?
1) गौरव जैन
2) लक्ष्मण नरसिंह
3) अँड्र्यू बोनफिल्ड
4) मेहमूद खान
उत्तर :- गौरव जैन हे रेकिट बेन्कीझर (इंडिया) या कंपनीचे नवीन प्रमुख आहेत.
चालू घडामोडी –
Q6] इंग्लंडच्या कोणत्या भागात डायनासोर प्रजातीच्या कमीतकमी 6 जातींच्या पायाचे ठसे असलेले जीवाश्म शोधले गेले आहेत, ज्यातून हे निष्पन्न झाले आहे की 110 दशलक्ष वर्षांपूर्वी ब्रिटनच्या भूमीवर शेवटचा डायनासोर अस्तित्वात होता?
1) लंडन
2) केंट
3) ब्रिस्टल
4) यापैकी नाही
उत्तर :- इंग्लंडच्या केंट प्रांतात डायनासोर प्रजातीच्या कमीतकमी 6 जातींच्या पायाचे ठसे असलेले जीवाश्म शोधले गेले आहेत, ज्यातून हे निष्पन्न झाले आहे की 110 दशलक्ष वर्षांपूर्वी ब्रिटनच्या भूमीवर शेवटचा डायनासोर अस्तित्वात होता.
चालू घडामोडी –
Q7] कोणत्या देशात ‘बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प’ आहे?
1)आर्मेनिया
2) इराण
3) तुर्कमेनिस्तान
4) अफगाणिस्तान
उत्तर :- इराणमधील बुशेहर शहराच्या लगत ‘बुशेहर अणुऊर्जा प्रकल्प’ आहे. हा इराणमधील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प आहे.
चालू घडामोडी –
Q8] कोणत्या जहाजाने ‘फ्लीट अवॉर्ड्स फंक्शन 2021’ मधील सर्वोत्कृष्ट लढाऊ जहाजाचा चषक जिंकला?
1) INS किल्टन
2) INS खुकरी
3) 1 आणि 2
4) यापैकी नाही
उत्तर :- भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील जहाजांच्या 2021 या वर्षामधील कामगिरीच्या आधारावर ‘फ्लीट अवॉर्ड्स फंक्शन 2021’ समारंभात पुरस्कारांचे वितरण झाले. ते पुढीलप्रमाणे आहेत –
पूर्व ताफ्यातील सर्वोत्कृष्ट जहाज – INS सह्याद्री सर्वोत्कृष्ट लढाऊ जहाजाचा चषक – INS खुकरी आणि INS किल्टन
चालू घडामोडी –
Q9] कोणत्या देशाने 22 जून व 23 जून 2021 रोजी ‘ग्रीन हायड्रोजन’ उपक्रम विषयक शिखर परिषद आयोजित केली?
1) चीन
2) दक्षिण आफ्रिका
3) भारत
4) ब्राझील
उत्तर :- भारत देशाने 22 जून आणि 23 जून 2021 रोजी ‘ग्रीन हायड्रोजन’ उपक्रम विषयक शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत प्रामुख्याने BRICS देशांचा समावेश असणार आहे.
चालू घडामोडी –
Q10] कोणत्या संघटनेने “आपत्ती जोखीम निवारण विषयक जागतिक मूल्यांकन अहवाल: दुष्काळ विषयी विशेष अहवाल 2021” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
1) IUCN
2) UNDP
3) UNEP
4) UNDRR
उत्तर :-संयुक्त राष्ट्रसंघ आपत्ती जोखीम निवारण कार्यालय (UNDRR) या संघटनेच्यवतीने “आपत्ती जोखीम निवारण विषयक जागतिक मूल्यांकन अहवाल: दुष्काळ विषयी विशेष अहवाल 2021” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालानुसार, या शतकात सुमारे 1.5 अब्ज लोक दुष्काळामुळे थेट परिणाम भोगत आहेत.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents