चालू घडामोडी : २३ जानेवारी २०२१

155

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 23 January 2021 | चालू घडामोडी : २३ जानेवारी २०२१

चालू घडामोडी – 

 

1] खालीलपैकी कोणता एक अभिजात वायु (नोबल गॅस) आहे?

1) नायट्रोजन
2) फ्लोरिन
3) आर्गोन
4) हेलियम

उत्तर :- हेलियम (He) हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, अभिजात / निष्क्रीय वायु (नोबल गॅस) आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक 2 आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमचा वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदु सर्वात कमी आहे. हेलियम हा हलका असून स्फोटक नसल्याने हैड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यात हेलियमचा वापर होतो. हेलियमचा शोध 18 ऑगस्ट 1868 रोजी सूर्याच्या क्रोमोस्फियरच्या लहरींचा पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या राज्यात रणथंभोर व्याघ्र प्रकल्प आहे?

1) छत्तीसगड
2) गुजरात
3) मध्यप्रदेश
4) राजस्थान

उत्तर :- रणथंभोर व्याघ्र प्रकल्प राजस्थानच्या सवाई माधोपूर शहरापासून सुमारे 13.5 कि.मी. अंतरावर व उत्तरेस बनस नदी व दक्षिणेस चंबळ नदीच्या काठी आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] ‘आंतरराष्ट्रीय वन दिन 2021’ याची संकल्पना काय आहे?

1) फॉरेस्ट अँड बायोडायव्हरसिटी: टू प्रेशियस टू लूज
2) फॉरेस्ट रिस्टोअरेशन: ए पाथ टू रीकव्हरी अँड वेल-बीइंग
3) फॉरेस्ट अँड एज्युकेशन
4) यापैकी नाही

उत्तर :- दरवर्षी 21 मार्च या दिवशी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय वन दिन’ साजरा करतात. यंदा “फॉरेस्ट रिस्टोअरेशन: ए पाथ टू रीकव्हरी अँड वेल-बीइंग” ही ‘आंतरराष्ट्रीय वन दिन 2021’ याची संकल्पना होती. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या राज्यात ‘ग्राम उजाला’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला?

1) बिहार
2) उत्तरप्रदेश
3) छत्तीसगड
4) झारखंड

उत्तर :- 19 मार्च 2021 रोजी बिहारच्या आरा येथे ‘ग्राम उजाला’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला, ज्याच्या अंतर्गत ग्रामीण ग्राहकांना एलईडी दिवे वाटप केले जातील. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या दिवशी ‘जागतिक कविता दिन’ साजरा करतात?

1) 18 मार्च
2) 19 मार्च
3) 21 मार्च
4) 20 मार्च

उत्तर :- दरवर्षी 21 मार्च या दिवशी ‘जागतिक कविता दिन’ साजरा करतात. 1999 साली संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (UNESCO) हा दिवसाची घोषणा केली होती. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या दिवशी भारतीय नौदलाची हवाई स्क्वाड्रन (INAS) 310 या सागरी तुकडीने त्याचा हिरक महोत्सवी स्थापना दिन साजरा केला?

1) 21 मार्च 2021
2) 20 मार्च 2021
3) 22 मार्च 2021
4) 19 मार्च 2021

उत्तर :- भारतीय नौदलाची गोव्यातील भारतीय नौदलाची हवाई स्क्वाड्रन (INAS) 310 “कोब्रा युनिट” नामक अद्भूत सागरी तुकडीने 21 मार्च 2021 रोजी त्याचा हिरक महोत्सवी स्थापना दिन साजरा केला. फ्रांसच्या हेरेस येथे 21 मार्च 1961 साली या तुकडीची स्थापना झाली होती. INAS310 याने 1961 सालापासून नौदलाच्या अनेक मोहिमांमध्ये देशासाठी अलौकिक सेवा बजावली आहे. तसेच देशाच्या किनारी भागात, दररोज टेहळणी कार्यही सातत्याने सुरु ठेवले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] “मुजीब जॅकेट” हे _____ यांनी परिधान करीत असलेले वस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.

1) शेख मुजीबुर रहमान
2) मौलाना अबुल कलाम आजद
3) जवाहरलाल नेहरू
4) मुहम्मद अली जिन्ना

उत्तर :- “मुजीब जॅकेट” हे बांगाबंधु शेख मुजीबुर रहमान (बांग्लादेशाचे राष्ट्रपिता/संस्थापक/पहिले प्रधानमंत्री) यांनी परिधान करीत असलेले वस्त्र म्हणून प्रसिद्ध आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणती व्यक्ती आत्ताचे दिल्ली शहर बनलेल्या तत्कालीन ‘दिल्लीका पुरी’चे संस्थापक होती?

1) पृथ्वीराज चौहान
2) कुतुबुद्दीन ऐबक
3) अनंगपाल दूसरा
4) बाबर

उत्तर :- महाराज पृथ्वीराज चौहान यांचे दरबारी कवी चांद बरदाई यांची हिंदी रचना ‘पृथ्वीराज रासो’ या पुस्तकात तोमर राजा अनंगपाल यांचे दिल्लीचे संस्थापक, म्हणून वर्णन केले गेले आहे. दिल्लीत तोमरांचा राज्य कालखंड 400 ते 1200 वर्षाचा आहे. ‘दिल्ली’ किंवा ‘दिल्लीका’ शब्दाचा वापर उदयपुरात सापडलेल्या शिलालेखांवर प्रथम सापडला. या शिलालेखांची वेळ 1160 वर्षे निश्चित केली गेली. महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्लीचे शेवटचे हिंदू सम्राट मानले जातात.
अकराव्या शतकातील तोमर राजा अनंगपाल दुसरा यांचा वारसा लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकारने एक समिती नेमली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] जापिस, गमोसा, झोराई हे कोणत्या राज्याच्या परंपरेचा भाग आहेत?

1) हिमाचल प्रदेश
2) आसाम
3) जम्मू व काश्मिर
4) कर्नाटक

उत्तर :- जापिस (टोकदार टोपी), हाताने विणलेले गमोसा कापड आणि बेल-मेटलपासून तयार केलेले झोराई नामक ताट हे आसाम राज्याच्या परंपरेचा भाग आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] खालीलपैकी कोणते निकोबार द्वीपसमूहामधील सर्वात मोठे बेट आहे?

1) कोंडुल बेट
2) कार निकोबार
3) ग्रेट निकोबार
4) पुलो मिलो

उत्तर :- अंदमान व निकोबार द्वीपसमूह यामधील ग्रेट निकोबार हे भारताच्या दक्षिणेकडील निकोबार बेट समूहामधील सर्वात मोठे बेट आहे.
अंदमान व निकोबार द्वीपसमूह हा भारताच्या आग्नेयेस असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. 

# Current Affairs

 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम