चालू घडामोडी : २३ मे २०२१

73

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 23 MAY 2021 | चालू घडामोडी : २३ मे २०२१

चालू घडामोडी – 

1] ‘कॉर्पसे’ फुले _____ येथे आढळून येतात.

1) हवाना, क्यूबा
2) बरो बेट, ऑस्ट्रेलिया
3) हाटिया बेट, बांग्लादेश
4) सुमात्रा, इंडोनेशिया

उत्तर :- ‘कॉर्पसे’ (शास्त्रीय नाव: अमॉर्फोफेलस टायटॅनम) ही फुल-वनस्पती सुमात्रा (इंडोनेशिया) प्रदेशातील वर्षावनात आढळून येते. सुमारे एका दशकात, त्याचे फूल 10 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस’ साजरा करतात?

1) 21 मे
2) 22 मे
3) 20 मे
4) 19 मे

उत्तर :- भारतात दरवर्षी 21 मे या दिवशी ‘राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस’ साजरा केला जातो. बेकायदेशीर आणि असमाजिक दहशतवादी कृत्याबद्दल आणि या कृतीमुळे लोकांच्या जीवनावर कसा परिणाम होतो याविषयी जागृती निर्माण करण्याचे उद्दीष्ट या दिनामागे ठेवले गेले आहे.
21 मे या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. मे 1991 मध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचारादरम्यान तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर येथे सभेला संबोधित करत असताना दहशतवाद्यांनी त्यांची हत्या घडवून आणली. या दिवसांचे औचित्य साधून 21 मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] EY संस्थेच्या “अक्षय ऊर्जा देश आकर्षकपणा निर्देशांक 2021” याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

1) पहिला
2) तिसरा
3) दुसरा
4) चौथा

उत्तर :- अर्नस्ट अँड यंग (EY) संस्थेच्या “अक्षय ऊर्जा देश आकर्षकपणा निर्देशांक 2021” याच्या यादीत अमेरिका आणि चीन या देशांच्या खालोखाल भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या संस्थेने ‘ऑक्सिजन रीसायकलिंग सिस्टम (ORS)’ विकसित केली?

1) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद
2) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद
3) दक्षिण नौदल कमांडचे इंडियन नेव्हीज डायव्हिंग स्कूल
4) यापैकी नाही

उत्तर :- महामारीच्या परिस्थित भासणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी दक्षिण नौदल कमांडचे इंडियन नेव्हीज डायव्हिंग स्कूल या संस्थेने ‘ऑक्सिजन रीसायकलिंग सिस्टम (ORS)’ विकसित केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणती व्यक्ती ‘जागतिक नृत्यदिग्दर्शन पुरस्कार 2020’ जिंकणारी प्रथम भारतीय ठरली?

1) प्रभु देवा
2) वैभव व्यापारी
3) सुरेश मुकुंद
4) शियामक डावर

उत्तर :- भारतीय नृत्यदिग्दर्शक सुरेश मुकुंद यांनी ‘जागतिक नृत्यदिग्दर्शन पुरस्कार 2020’ जिंकला असून हा पुरस्कार मिळवणारा तो प्रथम भारतीय ठरला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] ‘एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजेंस’ या संस्थेच्या एका अहवालानुसार, भारत आशिया-प्रशांत प्रदेशातील _____ सर्वात मोठी विमा-तंत्रज्ञान बाजारपेठ आहे.

1) सातवा
2) दूसरा
3) पहिला
4) चौथा

उत्तर :- ‘एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजेंस’ या संस्थेच्या एका अहवालानुसार, भारत आशिया-प्रशांत प्रदेशातील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी विमा-तंत्रज्ञान बाजारपेठ आहे. भारताचा या क्षेत्रात वाटा एकूण बाजारपेठेच्या 35 टक्के आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा करतात?

1) 21 मे
2) 19 मे
3) 20 मे
4) 22 मे

उत्तर :- दरवर्षी 21 मे या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ साजरा करतात. या दिवसाचे उद्दीष्ट चहाच्या शाश्वत उत्पादनास चालना देणे आणि दारिद्र्य आणि उपासमार यांच्या विरोधात लढा देण्यासाठी जागृती वाढविणे आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन झाले, ते एक सुप्रसिद्ध _____ होते.

1) शास्त्रीय गायक
2) पत्रकार
3) शास्त्रीय नर्तक
4) पर्यावरणवादी

उत्तर :- लोकप्रिय पर्यावरणवादी आणि चिपको चळवळ (1973) याचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे 21 मे 2021 रोजी निधन झाले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कलाक्षेत्र फाऊंडेशन ही _____ येथे असलेली एक कला व सांस्कृतिक संस्था आहे.

1) चेन्नई
2) नवी दिल्ली
3) बंगळुरू
4) कोलकाता

उत्तर :- चेन्नईची कलाक्षेत्र फाऊंडेशन ही एक कला व सांस्कृतिक संस्था आहे, जी भारतीय कला आणि हस्तकलांमधील, मुख्य म्हणजे भरतनाट्यम आणि गंधर्वेद संगीताच्या क्षेत्रात, पारंपारिक मूल्ये जपण्यासाठी समर्पित आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या संस्थेने ‘मायलॅब कोविसेल्फ’ नामक भारताची पहिली कोविड-19 स्व-परीक्षण किट विकसित केले?

1) डेमियन टीबी रिसर्च सेंटर, नेल्लोर
2) संरक्षण संशोधन प्रयोगशाळा, तेजपूर
3) मायलॅब डिस्कवरी सोल्यूशन्स, पुणे
4) लाल पथ लॅब, दिल्ली

उत्तर :- मायलॅब डिस्कवरी सोल्यूशन्स (पुणे) या कंपनीने ‘मायलॅब कोविसेल्फ’ नामक भारताची पहिली कोविड-19 स्व-परीक्षण किट विकसित केले. या उपकरनाद्वारे कोविड-19 चाचणी घरीच करता येणे शक्य झाले आहे आणि 15 मिनिटांत निकाल मिळतो. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम