चालू घडामोडी : २४ मार्च२०२१
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 24 March 2021 | चालू घडामोडी : २४ मार्च २०२१
चालू घडामोडी –
1] कोणत्या दिवशी जगप्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची जयंती साजरी करण्यात आली?
1) 20 मार्च 2021
2) 23 मार्च 2021
3) 22 मार्च 2021
4) 21 मार्च 2021
उत्तर :- 21 मार्च 2021 रोजी जगप्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची जयंती साजरी करण्यात आली
चालू घडामोडी –
2] कोणत्या संस्थेने ज्वालामुखी बंध (Volcano Bonds) सादर केले?
1) डॅनिश रेफुगी काऊंसिल
2) इंटरनॅशनल रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट मुव्हमेंट
3) अमेरिकन रेड क्रॉस
4) डॅनिश रेड क्रॉस
उत्तर :- जगात प्रथमच, डॅनिश रेड क्रॉस या संस्थेने ज्वालामुखी बंध (Volcano Bonds) सादर केले आहेत. ज्वालामुखीमुळे उद्भवणाऱ्या संकटांच्या संदर्भात हे बंध असून ते अनेक वित्तीय कंपन्यांच्या भागीदारीतून खरेदी केल्या जाणार. याद्वारे चिली, इक्वाडोर, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, कॅमरून, कोलंबिया आणि मेक्सिको अश्या 10 देशांमधील ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळे संकटात असलेल्या लोकांना मदत करणाऱ्या संस्थांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल.
चालू घडामोडी –
3] कोणत्या दिवशी बिहार दिवस साजरा करतात?
1) 22 मार्च
2) 21 मार्च
3) 23 मार्च
4) 20 मार्च
उत्तर :- दरवर्षी 22 मार्च या दिवशी बिहार राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात. 22 मार्च 1912 रोजी ब्रिटिश सरकारने बंगालमधून बिहारची निर्मिती केली
चालू घडामोडी –
4] कोणत्या शहरात 23 मार्च 2021 रोजी स्थायी सिंधू आयोगची बैठक झाली?
1) लाहोर
2) पटियाला
3) दिल्ली
4) जम्मू
उत्तर :- नवी दिल्ली येथे 23 मार्च 2021 रोजी;स्थायी सिंधू आयो;ची बैठक झाली. भारतीय संघाचे नेतृत्व सिंधू जल आयुक्त प्रदीप कुमार सक्सेना यांनी केले.सिंधू जल संधी (Indus Waters Treaty) हा 1960 साली झालेला पाकिस्तान-भारत या दोन दक्षिण आशियाई शेजारी राष्ट्रामधील संवेदनशील आणि तणाव परिस्थितीतही टिकून राहिलेला सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय करार म्हणून ओळखला जातो. सिंधू करार हा दोन्ही देशांमधील नद्यांचा वापरासंबंधित सहकार्य आणि माहितीचे विनिमय यासाठी एक यंत्रणा प्रदान करते, ज्याला स्थायी सिंधू आयोग म्हणून ओळखले जाते. यामध्ये दोन्ही देशांचे प्रत्येकी एक आयुक्त यामध्ये आहेत. करारांतर्गत दोनही देश बीस, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम या सहा नद्यांचे पाणी एकमेकांमध्ये वाटून घेत आहेत. 19 सप्टेंबर 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी या करारावर स्वाक्षर;या केल्या. करारानुसार रावी, बीस आणि सतलज या तीन पूर्वीय नद्यांवर भारताचे नियंत्रण आले होते. सिंधू, झेलम आणि चिनाब या तीन पश्चिम नद्यांवर पाकिस्तानचे नियंत्रण आले होते. तसेच भारत सिंधू नदीच्या केवळ 20% पाण्याचा सिंचन, वीजनिर्मिती आणि वाहतूक यासाठी वापर करू शकतो
चालू घडामोडी –
5] भारत सरकारच्यावतीने वर्ष 2020 यासाठीचा गांधी शांती पुरस्कार _____ यांना देण्यात आला.
1) सुलतान काबूस बिन सैद अल सैद
2) शेख मुजीबुर रहमान
3) योहे सासाकावा
4)व्लादीमीर पुतीन
उत्तर :- भारत सरकारच्यावतीने वर्ष 2020 यासाठीचा गांधी शांती पुरस्कार बंगाबंधु शेख मुजीबुर रहमान यांना देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेख मुजीबूर रहमान (17 मार्च 1920−15 ऑगस्ट 1975) हे बांगलादेशाचे संस्थापक−पंतप्रधान−राष्ट्राध्यक्ष व स्वातंत्र्य चळवळीचे एक थोर नेते होते.याशिवाय, ओमानचे दिवंगत राजे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांना वर्ष 2019 यासाठीचा गांधी शांती पुरस्कार देण्यात आला आहे.
चालू घडामोडी –
6] जागतिक जल दिन 2021 याची संकल्पना काय आहे?
1) वॉटर अँड क्लायमेट चेंज
2) लिव्हिंग नो वन बिहाइंड
3) नेचर फॉर वॉटर
4) व्हॅल्यूइंग वॉटर
उत्तर :- पाणी (जल) हा जीवनाचा स्त्रोत आहे. पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याकरिता दरवर्षी 22 मार्च या दिवशी जगभरात ;जागतिक जल दिनसाजरा करतात. 2021 यावर्षी हा दिवस “व्हॅल्यूइंग वॉटर” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे.
चालू घडामोडी –
7] कोणत्या समुद्रात व्हिट्सन प्रवाळी प्रदेश आहे?
1) दक्षिण चीन समुद्र
2) पूर्व चीन समुद्र
3) पिवळा समुद्र
4) पांढरा सागर
उत्तर :- दक्षिण चीन समुद्राच्या स्प्राटली बेटांमधील युनियन बँकच्या ईशान्य भागात ;व्हिट्सन प्रवाळी प्रदेशआहे. ते युनियन बँक (युनियन किनारा) याचा सर्वात मोठा प्रवाळी प्रदेश आहे
चालू घडामोडी –
8] पेप्सू मुजारा चळवळ याच्या संदर्भात मुजारा या शब्दाचा अर्थ काय आहे?
1) ज्या शेतकऱ्यांकडे 1 हेक्टरपेक्षा कमी भूमी आहे
2) ज्या शेतकऱ्यांकडे 2 ते 4 हेक्टर भूमी आहे
3) भूमिहीन शेतकरी
4) ज्या शेतकऱ्यांकडे 1 किंवा 2 हेक्टर भूमी आहे
उत्तर :- पेप्सू मुजारा चळवळ यातील ;मुजारा या शब्दाचा अर्थ ;भूमिहीन शेतकरी जो दुसऱ्याच्या भूमीवर काम करतो असा आहे.19व्या शतकाच्या उत्तरार्धात ;पटियालाच्या महाराजा;च्या अत्याचाराचा सामना करण्यासाठी;पटियाला आणि पूर्व पंजाब राज्ये संघ& यांनी चालविलेली ही चळवळ होती
चालू घडामोडी –
9] कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्याने फ्रीडम पायनॅपल आंदोलनाला सुरुवात केली?
1) चीन
2) तैवान
3) फिलिपिन्स
4) जपान
उत्तर :- तैवानपासून होणाऱ्या अननस आयातीवार चीनकडून घातलेल्या बंदीचा निषेध करण्यासाठी तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी ट्विटर मंचावरून फ्रीडम पायनॅपल आंदोलनाला सुरुवात केली
चालू घडामोडी –
10] कोणत्या नदीच्या केन आणि बेटवा या उपनद्या आहेत?
1) यमुना
2) गंगा
3) नर्मदा
4) चंबळ
उत्तर :- बेटवा ही यमुना नदीची उपनदी आहे जी, उत्तर भारताच्या प्रदेशात मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधून वाहते. तर केन नदी ही सुद्धा यमुना नदीची उपनदी आहे, जी मध्य भारताच्या बुंदेलखंड प्रदेशातली मोठी नदी आहे आणि मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधून वाहते.केन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या सरकारांसोबत सामंजस्य करार झाला.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents