चालू घडामोडी : 25 मार्च २०२१

161

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 25 March 2021 | चालू घडामोडी : २५ मार्च २०२१

चालू घडामोडी – 

 

1] कोणत्या देशाने 18 देशांच्या 38 उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात पाठवले?

1) रशिया
2) भारत
3) अमेरिका
4) जपान

उत्तर : – रशिया देशाने अलीकडेच सोयुझ-2.1a या प्रक्षेपकाचा वापर करून 18 देशांच्या 38 उपग्रहांना यशस्वीरित्या अंतराळात पाठवले. हे प्रक्षेपण कझाकस्तानमधून केले गेले. त्यातील ‘चॅलेंज-1’ हा उपग्रह ट्युनिशियाचा स्वदेशी बनविलेला पहिला उपग्रह आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] जलशक्ती मंत्रालयाने पाण्यासाठी नळ जोडणी करण्यासाठी _____ सोबत करार केला आहे.

1) संयुक्त राष्ट्रसंघ प्रकल्प सेवा कार्यालय (UNOPS)
2) UNICEF
3) UNESCO
4) जागतिक खाद्यान्न कार्यक्रम

उत्तर :- भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने भारतात पाण्यासाठी नळ जोडणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रकल्प सेवा कार्यालय (UNOPS) आणि डेन्मार्क देशाचे सरकार यांच्यासोबत करार केला आहे. करारामार्फत जल जीवन अभियानाच्या अंतर्गत उत्तरप्रदेशातील बुंदेलखंड आणि विंध्य भागातील 11 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये नळ जोडण्या केल्या जातील. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणते राज्य ‘इथेनॉल प्रोत्साहन धोरण’ आखणारे देशातील पहिले राज्य ठरले?

1) कर्नाटक
2) केरळ
3) बिहार
4) उत्तरप्रदेश

उत्तर :- बिहार राज्य हे स्वतःचे ‘इथेनॉल प्रोत्साहन धोरण’ आखणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जैव इंधन धोरणानुसार याची रचना केली गेली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या संस्थेने सार्वत्रिक बँका आणि लघु वित्त बँका (SFB) यांच्यासाठी केलेल्या अर्जांचे मूल्यांकन करण्यासाठी एक स्थायी बाह्य सल्लागार समिती नेमली?

1) SEBI
2) RBI
3) NABARD
4) SBI

उत्तर :- भारतीय रिझर्व बँकेने (RBI) श्यामला गोपीनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक स्थायी बाह्य सल्लागार समिती नेमली आहे. ही समिती सार्वत्रिक बँका आणि लघु वित्त बँका (SFB) यांच्यासाठी केलेल्या अर्जांचे मूल्यांकन करणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या राज्याच्या सरकारने प्राण्यांसाठी शासकीय रुग्णवाहिका जाळ्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे?

1) उत्तरप्रदेश
2) तेलंगणा
3) पंजाब
4) आंध्रप्रदेश

उत्तर :- भारताच्या इतिहासात प्रथमच, आंध्रप्रदेश सरकारने प्राण्यांसाठी शासकीय रुग्णवाहिका जाळे कार्यरत करण्याची घोषणा केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेकडून ई-निविदा प्रक्रियेसाठी स्थापना करण्यात आलेल्या पोर्टलचे नाव काय आहे?

1) प्रणित
2) प्राण
3) प्रणिता
4) प्रांत

उत्तर :- केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या पॉवरग्रीड या कंपनीने ई-निविदा प्रक्रियेसाठी “प्रणित” या नव्या पोर्टलची स्थापना केली आहे. या पोर्टलमुळे, निविदा प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचे प्रमाण कमी होईल आणि निविदा भरण्यात अधिक सुलभता आल्यामुळे निविदा प्रक्रिया जास्त पारदर्शक होईल. हे पोर्टल भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या एसटीक्यूसी अर्थात मानकीकरण, तपासणी तसेच दर्जा प्रमाणीकरण संचालनालयाने प्रमाणित केलेले आहे.
हे पोर्टल सुरु करून पॉवरग्रीड कंपनी आता सुरक्षा आणि पारदर्शकते बाबत एसटीक्यूसीने घालून दिलेल्या सर्व गरजांची पूर्तता करणारी आणि ई-खरेदी व्यवहारासाठी एसएपी-एसआरएम अर्थात पुरवठादार संबंधी व्यवस्थापनावर आधारित असलेली भारतातील एकमेव संस्था ठरली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या ठिकाणी ISRO संस्थेने ‘फ्री-स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ प्रणालीचे प्रदर्शन केले?

1) सतीश धवन अंतराळ केंद्र
2) भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बेंगळुरू
3) स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर (SAC), अहमदाबाद
4) यापैकी नाही

उत्तर :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) त्याच्या स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर (SAC अहमदाबाद) या केंद्रावरून अति-सुरक्षित ‘फ्री-स्पेस क्वांटम कम्युनिकेशन’ प्रणालीचे प्रदर्शन केले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] 2021 साली ‘जागतिक हवामान दिन’ याची संकल्पना काय आहे?

1) द ओशन, अवर क्लायमेट अँड वेदर
2) क्लायमेट अँड वॉटर
3) द सन, द अर्थ अँड द वेदर
4) वेदर-रेडी, क्लायमेट-स्मार्ट

उत्तर :- दरवर्षी 23 मार्च या दिवशी जगभरात ‘जागतिक हवामान दिन’ साजरा करतात. 2021 सालाचा जागतिक हवामान दिन “द ओशन, अवर क्लायमेट अँड वेदर” या संकल्पनेखाली जगभरात साजरा करण्यात आला आहे.
जागतिक हवामान संघटना (World Meteorological Organisation -WMO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतर-शासकीय संघटना आहे. 1873 साली ‘आंतरराष्ट्रीय हवामान संघटना’ या नावाने संस्था कार्यरत झाली होती. पुढे या संस्थेच्या जागी दिनांक 23 मार्च 1950 रोजी WMO याची स्थापना झाली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] क्रिडा मंत्रालयाने “खेलो इंडिया” योजनेचा कालावधी वर्ष 2021-22 वरून वाढवत _____ करण्याचा निर्णय घेतला आहे.

1) 2023-24
2) 2026-27
3) 2024-25
4) 2025-26

उत्तर :- क्रिडा मंत्रालयाने वर्ष 2016-17 मध्ये लागू करण्यात आलेल्या “खेलो इंडिया” योजनेचा कालावधी वर्ष 2021-22 वरून वाढवत वर्ष 2025-26 करण्याचा निर्णय घेतला आहे. या 5 वर्षांच्या कालावधीसाठी योजनेसाठी 8750 कोटी रुपयांचा आर्थिक गुंतवणूकीचा अंदाज आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] नाईट फ्रँक या संस्थेच्या ताज्या ‘जागतिक गृह किंमती निर्देशांक Q4 2020’ याच्या यादीत भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

1) 43 वा
2) 56 वा
3) 22 वा
4) 78 वा

उत्तर :-  स्थावर मालमत्तेच्या किंमतीविषयी स्पष्टता देणारी नाईट फ्रँक या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या ‘जागतिक गृह किंमती निर्देशांक Q4 2020’ याच्या यादीत भारत 56 व्या क्रमांकावर आहे. जागतिक क्रमवारीत टर्की प्रथम क्रमांकावर आहे. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम