चालू घडामोडी : २६ एप्रिल २०२१

80

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 26 April 2021 | चालू घडामोडी : २६ एप्रिल २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या दिवशी जगभरात ‘शांतीसाठी बहुपक्षीयवाद व मुत्सद्दीगिरी याचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्यात येतो?

1) 25 एप्रिल
2) 26 एप्रिल
3) 24 एप्रिल
4) 23 एप्रिल

उत्तर :- दरवर्षी 24 एप्रिल या दिवशी जगभरात ‘शांतीसाठी बहुपक्षीयवाद व मुत्सद्दीगिरी याचा आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्यात येतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] खालीलपैकी कोणता पुरस्कार ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021’ याच्या अंतर्गत देण्यात आला?

1) नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार
2) दीन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार
3)ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार
4) वरील सर्व

उत्तर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 एप्रिल 2021 रोजी ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 खालील श्रेणींमध्ये देण्यात येत आहेत –
दीन दयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार (224 पंचायती), नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार (30 ग्रामपंचायतींना), ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार (29 ग्रामपंचायतींना), बाल-स्नेही ग्रामपंचायत पुरस्कार (30 ग्रामपंचायती) आणि ई-पंचायत पुरस्कार (12 राज्ये).
पंतप्रधानांनी 5 लक्ष रुपये ते 50 लक्ष रुपयांपर्यंतच्या पुरस्कारांची रक्कम एक कळ दाबून संबंधित पंचायतींना हस्तांतरित केली. ही रक्कम तात्काळ संबंधित पंचायतीच्या बँक खात्यात जमा केली गेली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या राज्यात नीती खोरे आहे?

1) हिमाचल प्रदेश
2) उत्तराखंड
3) जम्मू व काश्मीर
4) सिक्किम

उत्तर :- उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात समुद्रसपाटीपासून 3600 मीटर उंचीवर नीती खोरे आहे.
23 एप्रिल 2021 रोजी भारत-चीन सीमेवरील चमोली जिल्ह्यात असलेल्या नीती खोरे येथील सुमना येथे हिमनदीचा स्फोट झाला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोण अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी (अटर्नी जनरल) या पदावर नियुक्ती झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली?

1) जेनिफर राजकुमार
2) केशा राम
3) निमा कुलकर्णी
4) वनिता गुप्ता

उत्तर :- वनिता गुप्ता ही अमेरिकेच्या न्याय विभागाचे सहाय्यक महान्यायवादी (अटर्नी जनरल) या पदावर नियुक्ती झालेली पहिली भारतीय वंशाची व्यक्ती ठरली आहे. सहाय्यक महान्यायवादी (अटर्नी जनरल) हे अमेरिकेच्या न्याय विभागातले तिसरे सर्वात मोठे पद आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] ‘आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन 2021’ याची संकल्पना काय आहे?

1) कनेक्टिंग गर्ल्स, क्रिएटिंग ब्राइटर फ्युचर्स
2) इन्सपायरिंग द नेक्स्ट जनरेशन
3) ब्रिजिंग द स्टँडर्डायझेशन गॅप
4) एक्सपांड होरीझोन, चेंज अॅटीट्यूड

उत्तर :- आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) या संघटनेच्या सदस्य देशांकडून दरवर्षी एप्रिल महिन्याचा चौथा गुरुवार हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन’ म्हणून साजरा केला जातो.
22 एप्रिल 2021 रोजी “कनेक्टिंग गर्ल्स, क्रिएटिंग ब्राइटर फ्युचर्स!” या संकल्पनेखाली ‘आंतरराष्ट्रीय माहिती व दळणवळण तंत्रज्ञानातील मुली दिन’ साजरा झाला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या मंत्रालयाने सरकारमध्ये फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FOSS) याला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी ‘#FOSS4GOV इनोव्हेशन चॅलेंज’ जाहीर केले?

1) दळणवळण मंत्रालय
2) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
3) माहिती व प्रसारण मंत्रालय
4) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

उत्तर :- इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सरकारमध्ये फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (FOSS) याला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी ‘#FOSS4GOV इनोव्हेशन चॅलेंज’ जाहीर केले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] केआरआय नानगाला (402) नामक लढाऊ पाणबुडी _____ या देशाची आहे.

1) भारतीय नौदल
2) श्रीलंका नौदल
3) इंडोनेशिया नौदल
4) बांगलादेश नौदल

उत्तर :- 21 एप्रिल 2021 रोजी हरविलेल्या इंडोनेशियाच्या नौदलाची केआरआय नानगाला (402) नामक लढाऊ पाणबुडी शोधण्यात मदत करण्यासाठी भारतीय नौदलाने ‘डीप सबमॉरन्स रेस्क्यू वेसल’ (DSRV) जहाज पाठविले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणत्या योजनेच्या अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभ केला?

1) प्रधानमंत्री जन धन योजना
2) प्रधानमंत्री मुद्रा योजना
3) राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान
4) सुधारित तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातील खेड्यांचे सर्वेक्षण आणि मानचित्रण (SVAMITVA)

उत्तर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2021 रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व / SVAMITVA (सुधारित तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातील खेड्यांचे सर्वेक्षण आणि मानचित्रण) योजनेच्या अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरंभ केला. यावेळी 4 लक्ष 9 हजार मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची कार्ड्स देण्यात आली आणि देशभरातील स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा आरंभ करण्यात आला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कोणत्या प्रक्षेपण स्थळावरून ‘क्रू-2’ मोहीम अंतराळात सोडण्यात आली?

1) सतीश धवन अंतराळ केंद्र
2) केनेडी एलसी-39ए
3) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र
4) केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशन

उत्तर :- 23 एप्रिल 2021 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील केनेडी एलसी-39ए या प्रक्षेपण स्थळावरून ‘क्रू-2’ मोहीम अंतराळात सोडण्यात आली. ‘क्रू-2’ मोहीमेच्या अंतर्गत 4 अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) पाठविण्यात आले. ही मोहीम NASA तर्फे स्पेसएक्स या कंपनीने प्रक्षेपित केली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या ठिकाणी कोवलून द्वीपकल्प आहे?

1) मकाऊ
2) शांघाय
3) हाँगकाँग
4) बीजिंग

उत्तर :- कोवलून द्वीपकल्प हाँगकाँगच्या प्रांतात मुख्य भूभागचा दक्षिणेकडील भाग आहे. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम