चालू घडामोडी : 26 जुन 2021
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 26 JUNE 2021 | चालू घडामोडी : २६ जुन २०२१
चालू घडामोडी –
Q1] भूतानचा टॅक्स इंस्पेक्टर्स विदाउट बॉर्डर्स (TIWB) कार्यक्रम याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. नेपाळच्या भागीदारीत भूतानचा टॅक्स इंस्पेक्टर्स विदाउट बॉर्डर्स (TIWB) कार्यक्रम राबविला जात आहे.
2. हा UNDP आणि OECD या संस्थांचा एक संयुक्त उपक्रम आहे.
1) फक्त 1
2) फक्त 2
3) 1 आणि 2
4) यापैकी एकही नाही
उत्तर :-केवळ विधान 2 अचूक आहे; त्यामुळे पर्याय (B) त्तर आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि आर्थिक सहकार्य व विकास संघटना (OECD) यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘टॅक्स इंस्पेक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ (TIWB) यांनी एका कार्यक्रमाचा 23 जून 2021 रोजी भूतान देशामध्ये प्रारंभ केला. भारत देशाची भूतानचा या कार्यक्रमामधील भागीदार अधिकारिता म्हणून निवड केली गेली आहे, ज्यामुळे भारतामधील तज्ञ लोकांचे पाठबळ भूतानला मिळणार आहे.
‘टॅक्स इंस्पेक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ (TIWB) कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कर आणि हस्तांतरण किंमतीच्या क्षेत्रामध्ये देशाच्या क्षमता बांधणीवर केंद्रित आहे.
चालू घडामोडी –
Q2] कोणत्या राज्यात ‘दावकी’ नावाचे एक गाव वसलेले आहे?
1) मेघालय
2) छत्तीसगड
3) राजस्थान
4) गुजरात
उत्तर :- मेघालयच्या पश्चिम जैतिया हिल्स जिल्ह्यात ‘दावकी’ गाव वसलेले आहे. बांगलादेशच्या सीमेजवळ हे गाव आहे.
चालू घडामोडी –
Q3] खालीलपैकी कोणते शहर सेंट व्हीन्सेंट व ग्रेनडाइन्स या कॅरिबियन देशाची राजधानी आहे?
1) अंडोरा ला वेला
2) किंग्सटाऊन
3) तिराना
4) पीटर डटन
उत्तर :- किंग्सटाऊन हे सेंट व्हीन्सेंट व ग्रेनडाइन्स या कॅरिबियन देशाचे राजधानी शहर आहे. हा बेटराष्ट्र लेसर अँटिल्सच्या दक्षिण-पूर्व विंडवर्ड बेटांवर वसलेला आहे.
23 जून 2021 रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि सेंट व्हीन्सेंट व ग्रेनडाइन्स यांच्यात कर विषयक माहितीचे आदान-प्रदान आणि संकलनात सहाय्य करण्यासाठीच्या कराराला मंजुरी देण्यात आली. या करारामुळे दोनही देशात माहितीचे आदान-प्रदान सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. यामध्ये बँका आणि इतर वित्तीय संस्थाकडून दिल्या जाणाऱ्या कायदेशीर आणि लाभकारी स्वामित्वाबाबतच्या माहितीचा समावेश आहे.
चालू घडामोडी –
Q4] शेरखान बंदर हे ठिकाण _____ या देशांमधील सीमा आहे.
1) भारत आणि पाकिस्तान
2) भारत आणि अफगाणिस्तान
3) अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान
4) म्यानमार आणि भारत
उत्तर :-शेरखान बंदर अफगाणिस्तान देशातील एक सीमावर्ती शहर. हे ठिकाण अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांमधील सीमा आहे.
चालू घडामोडी –
Q5] कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कारवार नौदल तळावरील पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेतला?
1) प्रोजेक्ट सीबर्ड
2) प्रोजेक्ट सागरमाला
3) प्रोजेक्ट जल
4) यापैकी नाही
उत्तर :-‘प्रोजेक्ट सीबर्ड’ अंतर्गत कर्नाटकातील कारवार नौदल तळावर पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.
चालू घडामोडी –
Q6] कोणत्या ठिकाणी भारतीय स्पर्धा आयोगाचे मुख्यालय आहे?
1) मुंबई
2) नवी दिल्ली
3) चेन्नई
4) बंगळुरू
उत्तर :- भारतीय स्पर्धा आयोग ही भारतातील उद्योग क्षेत्रातील स्पर्धेचे नियमन करणारी प्रमुख संस्था आहे. ही भारत सरकारची एक सांविधिक संस्था आहे, जी ‘स्पर्धा कायदा 2002’ याची अंमलबजावणी करते. आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.
चालू घडामोडी –
Q7] बटू सुकर संवर्धन कार्यक्रमाच्या अंतर्गत बंदिस्त केलेल्या 12 बटू सुकरांपैकी आठ आसामच्या _____ अभयारण्यात सोडण्यात आले आहेत.
1) काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य
2) मानस राष्ट्रीय अभयारण्य
3) दिब्रू सैखोवा राष्ट्रीय अभयारण्य
4) नामेरी राष्ट्रीय अभयारण्य
उत्तर :-बटू सुकर (pygmy hog) संवर्धन कार्यक्रमाच्या अंतर्गत बंदिस्त केलेल्या दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या 12 बटू सुकरांपैकी आठ आसामच्या मानस राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले आहेत. उर्वरित चारला 25 जूनला मोकळे सोडण्यात येणार.
चालू घडामोडी –
Q8] कोणत्या कंपनीने ‘ऊर्जास्विनी’ नामक महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
1) ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
2) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
3) GAIL इंडिया
4) यापैकी नाही
उत्तर :- ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) या सार्वजनिक कंपनीने 23 जून 2021 रोजी ‘ऊर्जास्विनी’ नामक महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाचा प्रारंभ केला. हा पाच ते सहा महीने चालणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधून ONGC मधील महिला पदाधिकार्यांना नेतृत्व पदे गाठण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार.
चालू घडामोडी –
Q9] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिवस’ साजरा करतात?
1) 22 जून
2) 23 जून
3) 24 जून
4) 25 जून
उत्तर :- दरवर्षी 23 जून या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिवस’ साजरा करतात. विधवांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस पाळतात.
चालू घडामोडी –
Q10] आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तित ‘डेल्टा प्लस’ प्रकाराला ‘_____’ म्हणून वर्गीकृत केले आहे.
1) व्हेरीएन्ट ऑफ एटेन्शन
2) व्हेरीएन्ट ऑफ वरी
3) व्हेरीएन्ट ऑफ कंसर्न
4) यापैकी नाही
उत्तर :-केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तित ‘डेल्टा प्लस’ प्रकाराला ‘व्हेरीएन्ट ऑफ कंसर्न (चिंतेचे उत्परिवर्तन)’ म्हणून वर्गीकृत केले आहे.
आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents