चालू घडामोडी : २८ डिसेंबर २०२०

185

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 28 December 2020 | चालू घडामोडी : २८ डिसेंबर २०२०

चालू घडामोडी – 

भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IIT) विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया आणि प्राध्यापकांसाठी भरती प्रक्रिया यांच्यामध्ये दिले जाणाऱ्या आरक्षणाशी संबंधित शिफारशीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने व्ही. रामगोपाल राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

‘शमशूर रहमान फारुकी’ हे उर्दू भाषेतले एक कवी आणि उर्दू समीक्षक व सिद्धांतकार होते. त्यांचे “कई चांद थे सारे आसमान” पुस्तक प्रसिद्ध आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना (Organization of the Petroleum Exporting Countries -OPEC) ही 15 देशांची एक आंतरसरकारी संघटना आहे. या संघटनेची स्थापना पहिल्या पाच सदस्य देशांकडून बगदाद शहरात 1960 साली करण्यात आली. याचे मुख्यालय 1965 सालापासून व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) या शहरात आहे. ही राष्ट्रे जागतिक तेल उत्पादनाच्या अंदाजे 43 टक्के उत्पादन घेतात आणि येथे जगात आढळून येणार्‍या एकूणच्या 73 टक्के तेल साठा आहे.
वर्तमानात असलेले OPECचे सदस्य देश पुढीलप्रमाणे आहेत – अल्जेरिया, अंगोला, इक्वाडोर, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, इराण, इराक, कुवैत, लिबिया, नायजेरिया, कतार, काँगो प्रजासत्ताक, सौदी अरब, संयुक्त अरब अमीरात आणि व्हेनेझुएला. खंडानुसार, दोन दक्षिण अमेरिकन, सात अफ्रिकन आणि सहा आशियाई (मध्य पूर्व) देश या समूहात आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश आणि अमेरिकेचे शिक्षणतज्ज्ञ अमित अहूजा यांना समकालीन/ आधुनिक भारतातल्या सर्वोत्कृष्ट कल्पित पुस्तकासाठी “2020 कमलादेवी चट्टोपाध्याय न्यू इंडिया फाऊंडेशन (NIF) बूक प्राइज” हा पुरस्कार देण्यात आला आहे.
अहुजा यांना ‘मोबिलायझिंग द मार्जिनलाइज्ड: एथनिक पार्टीज विथ एथनिक मूव्हमेंट्स’ या पुस्तकासाठी तर जयराम रमेश यांना ‘ए चेकर्ड ब्रिलियन्सः द मेनी लाइव्ह्स ऑफ व्ही के कृष्णा मेनन’ या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

मुंबई शहरात टाटा-भारतीय कौशल्य संस्था (IIS) याच्या कार्याला सुरुवात झाली. ही संस्था केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

गूगल पे या कंपनीने व्यापाऱ्यांसाठी ‘टोकनाइज्ड पेमेंट’ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पेयू कंपनीसोबत करार केला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

पाकिस्तान देशातल्या बलुचिस्तान प्रांतातली एक मानवी हक्क कार्यकर्त्या राहिलेल्या करीमा बलोच या 22 डिसेंबर 2020 रोजी कॅनडाच्या टोरोंटो येथे मृत अवस्थेत आढळल्या. 2016 साली BBCच्या शंभर प्रेरणादायक आणि प्रभावी महिलांच्या यादीमध्ये त्यांना स्थान दिले गेले होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

सरकारी धोरणांबाबत नागरिकांच्या अभिप्रायाच्या आधारे नागरिक केंद्रित सेवांच्या सुलभतेसाठी पंजाब सरकारने ‘PR इनसाइट’ नावाने एक मोबाइल अॅप व संकेतस्थळ तयार केले आहे. 

# Curret Affairs


चालू घडामोडी – 

हातळण्याजोगे जल तपासणी उपकरणे विकसित करण्यासाठी उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DIITP) आणि राष्ट्रीय जल जीवन अभियान यांच्यावतीने “न्यू इनोव्हेशन चॅलेंज” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेच्या (IISER) संशोधकांना वनस्पतीला हिरवा रंग प्राप्त होण्यामध्ये मदत करणारा एक जीन सापडला आणि त्याचे ‘BBX11’ जीन असे नामकरण करण्यात आले आहे. हा जीन क्लोरोफिल या अननुभवी रंगद्रव्याच्या जैवसंस्लेशनात मध्यस्थी ठरणाऱ्या ‘प्रोटोक्लोरोफिलाइड या घटकाचे प्रमाण व्यवस्थापित करण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये भाग घेतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी सराव पेपर 28 December 2020

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम