चालू घडामोडी : २८ मार्च २०२१

153

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 28 March 2021 | चालू घडामोडी : २८ मार्च २०२१

चालू घडामोडी – 

 

1] कोणत्या राज्यात ‘परवडण्याजोगे भाडे असलेली घरे आणि संकुले (ARHC) योजना लागू करण्यात आली आहे?

1) कर्नाटक
2) उत्तरप्रदेश
3) झारखंड
4) गुजरात

उत्तर :- उत्तरप्रदेश सरकारने राज्यात ‘परवडण्याजोगे भाडे असलेली घरे आणि संकुले (ARHC) योजना लागू केली आहे. योजनेंतर्गत शहरी स्थलांतरित, विद्यार्थी व शहरी गरीब लोक यांना भाड्याने घरे दिली जातील. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या देशाने ‘गर्भपात शोक रजा कायदा’ मंजूर केला?

1) स्वीडन
2) भारत
3) न्युझीलँड
4) जपान

उत्तर :- न्युझीलँड देशाने ‘गर्भपात शोक रजा कायदा’ मंजूर केला आहे. यापूर्वी असा कायदा करणारा भारत हा पहिला देश होता. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणती व्यक्ती योगच्या संभाव्यतेचा शोध घेण्यासाठी आयुष मंत्रालयाकडून नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय आंतरशाखीय तज्ञ समितीचे अध्यक्ष आहे?

1) बाबा रामदेव
2) आचार्य बाळकृष्ण
3) योगी आदित्यनाथ
4) डॉ. एच. आर. नागेंद्र

उत्तर :- कार्यालयातील व्यक्तींची उत्पादकता वाढविण्यासाठी योगपासून मिळणाऱ्या लाभांचा वापर केला जाऊ शकतो का? याचा व्यापक अवलंब करून अर्थव्यवस्थेची पध्दतशीर वृद्धी आणि विकासावर आणि त्यामुळे देशावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो का? हे प्रश्न उपस्थित करत, योगचा उपयोग कार्यक्षमतेत वृध्दी करण्याबाबत तसेच अन्य पैलू यांची चाचपणी करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने एक उच्चस्तरीय आंतरशाखीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे (SUVASA) कुलपती डॉ. एच. आर. नागेंद्र हे आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या दिवशी “गुलामी आणि अटलांटिक पार गुलाम व्यापाराला बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन” पाळला जातो?

1) 25 मार्च
2) 26 मार्च
3) 24 मार्च
4) 23 मार्च

उत्तर :- संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने दरवर्षी 25 मार्च या दिवशी जगभरात “गुलामी आणि अटलांटिक पार गुलाम व्यापाराला बळी पडलेल्यांच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय दिन” पाळला जातो. पूर्वाग्रह आणि वर्णद्वेषाच्या धोक्यांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
2021 साली या दिनाची संकल्पना – “एंडिंग स्लेव्हरीज लेगसी ऑफ रेसिझम: ए ग्लोबल इम्पेरेटिव्ह फॉर जस्टिस”. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणत्या राज्यात सातकोसिया व्याघ्र प्रकल्प आहे?

1) मध्यप्रदेश
2) राजस्थान
3) झारखंड
4) ओडिशा

उत्तर :- ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यात सातकोसिया व्याघ्र प्रकल्प आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या राज्यात ‘शिग्मो’ महोत्सव साजरा केला जातो?

1) आसाम
2) गोवा
3) त्रिपुरा
4) बिहार

उत्तर :- गोव्यात साजरा होणारा ‘शिग्मो’ महोत्सव हा वसंतोत्सव आहे. हा गोव्यातील कोंकणी समुदायाचा प्रमुख सण आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] नागरी विमानचालन सुरक्षेच्या संदर्भात नवी दिल्ली येथे नागरी विमानचालन सुरक्षा विभाग (BCAS) आणि ______ यांच्यात करार पत्रावर (LoA) स्वाक्षरी झाली.

1) अलाहाबाद विमानतळ
2) बरेली विमानतळ
3) यमुना आंतरराष्ट्रीय विमानतळ
4) चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ

उत्तर :- नागरी विमानचालन सुरक्षेच्या संदर्भात नवी दिल्ली येथे नागरी विमानचालन सुरक्षा विभाग (BCAS) आणि यमुना आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यात करार पत्रावर (LoA) स्वाक्षरी झाली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणत्या देशासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वर्ण जयंती विद्यावेतन’ योजनेची घोषणा केली?

1) भुटान
2) नेपाळ
3) श्रीलंका
4) बांग्लादेश

उत्तर :- बांगलादेश देशातल्या संशोधकांसाठी भारत सरकारच्यावतीने पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वर्ण जयंती विद्यावेतन’ योजनेची घोषणा केली. हे विद्यावेतन विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची वार्षिक योजना आहे. मूलभूत किंवा उपयोजित विषयांमध्ये तरुण शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय संशोधनासाठी विद्यावेतन दिले जाणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय छाननी (Scrutiny) केंद्र उघडले?

1) निगम कार्य मंत्रालय
2) दळणवळण मंत्रालय
3) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
4) माहिती व प्रसारण मंत्रालय

उत्तर :- निगम कार्य मंत्रालयाने (Ministry of Corporate Affairs). नवी दिल्लीत केंद्रीय छाननी (Scrutiny) केंद्र (CSC) उभारले आहे आणि ‘गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA)’ मोबाइल ॲप विकसित केले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या राज्यात ‘MICE रोड शो: मीट इन इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे?

1) उत्तरप्रदेश
2) मध्यप्रदेश
3) पश्चिम बंगाल
4) बिहार

उत्तर :- मध्यप्रदेशाच्या खजुराहो येथे पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत ‘छत्रसाल कंव्हेनशन सेंटर’ उभारले गेले आहे. पर्यटन मंत्रालयाने या ठिकाणी 25 मार्च ते 27 मार्च 2021 या कालावधीत ‘MICE गंतव्य’ (MICE: बैठका, प्रोत्साहन, सभा आणि प्रदर्शन) म्हणून भारताच्या जाहिरातीसाठी ‘MICE रोड शो: मीट इन इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन केले.मध्यप्रदेशाच्या खजुराहो येथे पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत ‘छत्रसाल कंव्हेनशन सेंटर’ उभारले गेले आहे. पर्यटन मंत्रालयाने या ठिकाणी 25 मार्च ते 27 मार्च 2021 या कालावधीत ‘MICE गंतव्य’ (MICE: बैठका, प्रोत्साहन, सभा आणि प्रदर्शन) म्हणून भारताच्या जाहिरातीसाठी ‘MICE रोड शो: मीट इन इंडिया’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम