चालू घडामोडी : ३ मे २०२१
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 3 May 2021 | चालू घडामोडी : ३ मे २०२१
चालू घडामोडी –
1] कोणत्या व्यक्तीला ‘युधवीर स्मारक पुरस्कार 2021’ देण्यात आला?
1) देवी शेट्टी
2) डॉ. एव्हिटा फर्नांडिज
3) इंदिरा हिंदुजा
4) यापैकी नाही
उत्तर :- हैदराबादच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. एव्हिटा फर्नांडिज यांना ‘युधवीर स्मारक पुरस्कार 2021’ देण्यात आला. भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
चालू घडामोडी –
2] _____ यांच्यादरम्यान “2+2 मंत्रीस्तरीय संवाद” आयोजित केला जातो.
1) संरक्षण मंत्री
2) परराष्ट्र मंत्री
3) *1 आणि 2*✅
4) यापैकी नाही
उत्तर :- 28 एप्रिल 2021 रोजी भारत आणि रशिया या देशांनी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या “2+2 मंत्रीस्तरीय संवाद”ची स्थापना करण्यास सहमती दर्शविली.
सध्या भारताने अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यातल्या “2+2 मंत्रीस्तरीय संवाद”ची स्थापना केली आहे.
चालू घडामोडी –
3]‘मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समिती’ने (CCSCH) याचे अध्यक्ष कोण आहेत?
1) डॉ एम. आर. सुदर्शन
2) रीटा तिओतीया
3) सुभाष चंद्र खुंटिया
4) यापैकी नाही
उत्तर :- भारत देश मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समितीचे (CCSCH) अध्यक्ष आहे आणि त्याचे सचिवालय ‘मसाले मंडळ भारत’ हे आहे. डॉ एम. आर. सुदर्शन या समितीचे वर्तमानातले अध्यक्ष आहेत.
कोडेक्स अॅलिमेंटेरियस कमिशन (CAC) याच्या ‘मसाले आणि पाक औषधी वनस्पती याविषयक कोडेक्स समिती’ने (CCSCH) लवंग, ओरेगॅनो, तुळस आणि आले या चार मसाल्यांसाठी गुणवत्ता मानके निश्चित केली आहेत.
चालू घडामोडी –
4] अलीकडेच निधन झालेले सोली सोराबजी भारताचे माजी ______ होते.
1) भारताचे सरन्यायाधीश
2) भारताचे उपराष्ट्रपती
3) भारतीय भूदलाचे प्रमुख
4) भारताचे अॅटर्नी जनरल
उत्तर :-भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे 30 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. ते 1989-1990 आणि 1998-2004 अश्या दोन कार्यकाळात भारताचे अॅटर्नी जनरल होते.
चालू घडामोडी –
5] खालीलपैकी कोणत्या कारणासाठी ‘समुद्र सेतु द्वितीय’ मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला?
1) द्रवरूप ऑक्सिजनची वाहतूक
2) अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणणे
3) यमुना नदीवर पूल बांधणे
4) यापैकी नाही
उत्तर :-कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणि ‘समुद्र सेतू द्वितीय’ या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या सात नौका तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय नौदलाच्या INS कोलकाता, INS कोची, INS तलवार, INS तबर, INS त्रिकंद, INS जलश्व आणि INS ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत.
चालू घडामोडी –
6] कोणाला जपान सरकारच्यावतीने ‘ऑर्डर ऑफ द राइझिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
1) आनंद कुमार
2) टी. एन. सीमा
3) श्यामला गणेश
4) शिवानी वर्मा
उत्तर :- बेंगळुरू येथील जपानी शिक्षिका श्यामला गणेश यांना जपान सरकारच्यावतीने ‘ऑर्डर ऑफ द राइझिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
चालू घडामोडी –
7] 2021 साली ‘गुरु तेग बहादुर’ यांचा _____ प्रकाश पर्व साजरा करण्यात आला.
1) 395 वा
2) 397 वा
3) 405 वा
4) 400 वा
उत्तर :-1 मे 2021 रोजी नववे शीख गुरु तेग बहादुर यांचा 400 वा प्रकाश पर्व साजरा करण्यात आला.
चालू घडामोडी –
8] ‘बेनिन ब्रॉन्झ’ हे _____ आहेत.
1) इराणमधील ऐतिहासिक वास्तू
2) प्राचीन घरे
3) धातू पट्टीका व शिल्प
4) यापैकी नाही
उत्तर :- ‘बेनिन ब्रॉन्झ’ हा हजाराहून अधिक धातू पट्टीका व शिल्पांचा संग्रह आहे, ज्याने बेनिनच्या राजवाड्यास (आताच्या नायजेरियातले) सुशोभित केले आहे.
चालू घडामोडी –
9] कोणत्या देशात ‘काराउन तलाव’ आहे?
1) लेबनॉन
2) इजिप्त
3) टर्की
4) इराण
उत्तर :- लेबनॉन देशात ‘काराउन तलाव’ आहे. हा बेकाअ व्हॅलीच्या दक्षिणेकडील भागात असलेला एक कृत्रिम तलाव आहे.
चालू घडामोडी –
10]कोणत्या कंपनीने मोजाव एअर अँड स्पेस पोर्ट येथून जगातील सर्वात मोठ्या विमानाची चाचणी पूर्ण केली?
1) स्पेसएक्स
2) ब्ल्यु मून
3) स्ट्रेटोलॉंच
4) एक्ससीओआर एरोस्पेस
उत्तर :- अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉंच कंपनीचे तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानाने त्याचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ही चाचणी कॅलिफोर्निया येथे घेण्यात आली. चाचणीदरम्यान विमान 14,000 फूट (4,267 मी) उंचीवर ताशी 199 मैल एवढ्या सर्वोच्च गतीपर्यंत पोहोचले होते.
विमानाच्या पंखांच्या विस्ताराची एकूण लांबी 385 फूट (117 मीटर) आहे. विमान 550,000 पौंड (250 टन) एवढे भार वाहू शकते. विमानामध्ये एकूण सहा इंजिन बसविण्यात आले आहेत.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents