चालू घडामोडी : ३० डिसेंबर २०२०
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 30 December 2020 | चालू घडामोडी : ३० डिसेंबर २०२०
चालू घडामोडी –
स्कायरूट एरोस्पेस या भारतीय स्टार्ट-अप कंपनीने घन-इंधनावर चालणाऱ्या ‘कलाम-5’ नामक रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.
चालू घडामोडी –
28 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मणीपूरमधील इम्फाळ शहरात आभासी पद्धतीने थोबल बहुउद्देशीय प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे 35,104 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
चालू घडामोडी –
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पंजाब केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची एक समिती नेमली आहे. ही समिती पुढील शैक्षणिक वर्षापासून स्नातक शिक्षण स्तरावर समाईक प्रवेश परीक्षा घेण्याविषयीचा मुद्दा हाताळण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
चालू घडामोडी –
प्राचीन रोमन साम्राज्यातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर नष्ट झालेल्या पॉम्पेई शहरात अल्पोपहाराचे खरेदी-विक्री केंद्र होते असा शोध पुरातत्व विभागाच्या शास्त्रज्ञांना लागला आहे. अल्पोपहाराचे खरेदी-विक्री केंद्र याला लॅटिन भाषेत “थर्मोपोलियम” हे नाव आहे.
चालू घडामोडी –
डॉ. रूपा च्यारी या ‘सुत्रनिवेदनाची सूत्रा – एक अणभव’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाच्या लेखिका आहेत.
चालू घडामोडी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा मार्गावर (जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत) भारताच्या पहिल्या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले. मॅजेंटा मार्गावर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक मार्गामध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत.
चालू घडामोडी –
केवळ विधान-1 अचूक असल्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
वर्तमानात “इनर लाइन परमिट” व्यवस्थेत अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड आणि मणीपूर या चार राज्यांचा समावेश आहे.
चालू घडामोडी –
“पोर्तुलाका लालजी” ही सन रोज (उर्फ सूर्य गुलाब) नामक वनस्पतीची एक नवीन जात आहे, जी वैज्ञानिकांनी पूर्व घाटात शोधली. आंध्रप्रदेशातल्या प्रकाशम जिल्ह्यात त्याचा शोध लागला. त्याला लालसर गुलाबी फुले लागतात. या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या वेळी फुले उघडतात.
चालू घडामोडी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 डिसेंबरला दूरदृश्य प्रणालीद्वारे ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या (EDFC) न्यू भाऊपूर-न्यू खुर्जा भागाचे उद्घाटन झाले. EDFCचा 351 किलोमीटर लांबीचा न्यू भाऊपूर ते न्यू खुर्जा भागाचा हा मार्ग उत्तरप्रदेश राज्यात असून तो बांधण्यासाठी 5,750 कोटी रुपये खर्च आला आहे.
ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (1856 किलोमीटरचा मार्ग) साहनेवाल, लुधियाना (पंजाब) येथून सुरू होत असून पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, बिहार, आणि झारखंड या राज्यांमधून जात पश्चिम बंगालच्या डान्कुनी येथे संपतो. हा मार्ग डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) या कंपनीच्या मार्फत बांधला जात आहे, जी अशा प्रकारचे समर्पित मालवाहतूक मार्ग तयार करण्याच्या आणि चालविण्याच्या उद्देशाने तयार केलेली विशेष संस्था आहे. कंपनी पश्चिम विभागात आणखी मार्ग (1504 किलोमीटरचा मार्ग) बांधत आहे जो उत्तरप्रदेशातले दादरी या ठिकाणाला मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदराला जोडणारा असून तो उत्तरप्रदेश, हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणार.
चालू घडामोडी –
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी देशाच्या पहिल्या न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लसीचे उद्घाटन केले. ही स्वदेशी लस बाजारात “न्युमोसील” या ब्रांड खाली माफक दरात उपलब्ध होणार. जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेच्या भागीदारीने ही लस विकसित केली आहे. ही लस न्युमोकोकल जिवाणूला लक्ष्य करते, ज्यामुळे न्युमोनिया आणि मेंदूज्वर व सेप्सिस यासारखे गंभीर जीवघेणा आजार होतात.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents