चालू घडामोडी : ३० मे २०२१

178

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 30 MAY 2021 | चालू घडामोडी : ३० मे २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या व्यक्तीने 25 तास आणि 50 मिनिटांमध्ये एव्हरेस्ट शिखर गाठून विश्वविक्रम केला?

1) संतोष यादव
2) अरुणिमा सिन्हा
3) मालवत पूर्णा
4) सांग यिन-हंग

उत्तर :- हाँगकॉँगची गिर्यारोहक सांग यिन-हंग या 44 वर्षांच्या माजी शिक्षिकाने केवळ 25 तास आणि 50 मिनिटांमध्ये एव्हरेस्ट शिखर (उंची 8,848.86 मीटर) गाठून विश्वविक्रम केला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या ठिकाणी इस्लामिक सहकार्य संघटना (OIC) याचे मुख्यालय आहे?

1) जेद्दाह, सौदी अरब
2) ब्रुसेल्स, बेल्जियम
3) अबू धाबी, संयुक्त अरब अमिराती
4) बर्न, स्वित्झर्लंड

उत्तर :- इस्लामिक सहकार्य संघटना (Organisation of Islamic Cooperation -OIC) ही 1969 साली स्थापना करण्यात आलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. या संघटनेचे 57 देश सदस्य आहेत. ही संघटना अरब खंडासोबतच जगभरात मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशांमध्ये सहकार्‍याविषयी प्रोत्साहन देते. त्याचे मुख्यालय जेद्दाह (सौदी अरब) येथे आहे.
इस्लामिक सहकार्य संघटनेने (OIC) संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क परिषद (UNHRC) यापुढे एका कायमस्वरूपी आयोगाची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेणेकरून त्या आयोगाकडे इस्रायल, गाझा आणि वेस्ट बँक प्रदेशात होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाची नोंद केली जाऊ शकणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] किती ‘ओपन स्काई ट्रीटी’ या करारामध्ये सदस्य आहेत?

1) 56
2) 34
3) 21
4) 10

उत्तर :- अमेरिकेच्या पुढाकाराने 24 मार्च 1992 रोजी ‘ओपन स्काई ट्रीटी’ या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार 2002 साली लागू झाला. या करारामध्ये 34 सहभागी देश आहेत. या करारामुळे एका सदस्य देशाला दुसऱ्या सदस्य देशांच्या लष्करी सुविधांवर पाळत ठेवणारी विमाने त्याच्या हवाई हद्दीत उडवता येते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या व्यक्तीची सीरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली?

1) बशर अल-असाद
2) साहले-वर्क झेवदे
3) अली बोंगो ओंडिम्बा
4) इब्राहिम बौबॅकर कीटा

उत्तर :- सीरियाचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांची राष्ट्राध्यक्ष पदाच्या सलग चौथ्या कार्यकाळासाठी परत एकदा निवड झाली. ते पदावर 17 जुलै 2000 पासून आहेत.
सीरिया हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबेनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैर्ऋत्येला इस्रायल देश आहेत. दमास्कस ही सीरियाची राजधानी आहे. सीरियन पाऊंड हे राष्ट्रीय चलन आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] “तुत्सीविरूद्ध झालेला नरसंहार” या घटनेला _____ या नावाने देखील ओळखले जाते.

1) नाझी नरसंहार
2) द्वितीय कांगो युद्ध
3) रवांडा नरसंहार
4) यापैकी नाही

उत्तर :- 1994 साली रवांडा देशामधील तुत्सीविरूद्ध झालेल्या नरसंहाराच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय परावर्तन दिन दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. रवांडाचा नरसंहारात रवांडाच्या तत्कालीन हुतू बहुसंख्य सरकारच्या सदस्यांनी तुत्सी वंशाच्या लोकांचा वध केला होता, त्यात केवळ 100 दिवसांमध्ये अंदाजे 800,000 हून अधिक लोकांना मारण्यात आले होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल नाक्यावर प्रत्येक वाहनाला _____ यापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही याविषयीची खात्री करण्यासाठी मार्गदर्शके जाहीर केली आहेत.

1) 15 सेकंद
2) 20 सेकंद
3) 10 सेकंद
4) यापैकी नाही

उत्तर :- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल नाक्यावर प्रत्येक वाहनाला 10 सेकंदापेक्षा अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही याविषयीची खात्री करण्यासाठी मार्गदर्शके जाहीर केली आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या दिवशी ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल दिवस’ साजरा करतात?

1) 27 मे
2) 30 मे
3) 29 मे
4) 28 मे

उत्तर :- दरवर्षी 28 मे या दिवशी ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल दिवस’ साजरा करतात.
28 मे 1961 रोजी लंडनमध्ये अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना झाली. ही मानवी हक्कांसाठी लढणारी एक अशासकीय संस्था आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणत्या चित्रपटाने इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एंजेलिस (IFFLA) याच्या समारंभात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकला?

1) सेथथूमन
2) बिरीयाणी
3) ओरू पक्का कथई
4) पावा कढैगल

उत्तर :- तमिळ दिग्दर्शक थामिझ यांच्या ‘सेथथूमन’ (डुक्कर) या चित्रपटाने अमेरिकेत झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एंजेलिस (IFFLA) याच्या 2021 समारंभात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कोणत्या खंडात माली देश येतो?

1) युरोप
2) उत्तर अमेरीका
3) आशिया
4) आफ्रिका

उत्तर :- मालीचे प्रजासत्ताक हा आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील एक देश आहे. मालीच्या उत्तरेला अल्जीरिया, पूर्वेला सुदान, दक्षिणेला बर्किना फासो व कोत द’ईवोआर, आग्नेयेला गिनी तर पश्चिमेला सेनेगाल व मॉरिटानिया हे देश आहेत. मालीचा उत्तर भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे. बामाको ही मालीची राजधानी आहे. पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक हे राष्ट्रीय चलन आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांती सैनिक दिवस’ साजरा करतात?

1) 26 मे
2) 27 मे
3) 29 मे
4) 28 मे

उत्तर :- दरवर्षी 29 मे या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांती सैनिक दिवस’ साजरा करतात. 2021 साली ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांती सैनिक दिवस’ “द रोड टू ए लास्टिंग पीस: लीव्हरेजिंग द पॉवर ऑफ यूथ फॉर पीस अँड सेक्युरिटी” या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम