चालू घडामोडी : ३१ मे २०२१

106

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 31 MAY 2021 | चालू घडामोडी : ३१ मे २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या दिवशी ‘नॅशनल AI पोर्टल’ या संकेतस्थळाने पहिला वर्धापन दिन साजरा केला?

1) 27 मे 2021
2) 30 मे 2021
3) 29 मे 2021
4) 28 मे 2021

उत्तर :- ‘नॅशनल AI पोर्टल (https://indiaai.gov.in)’ या संकेतस्थळाने 28 मे 2021 रोजी त्याचा पहिला वर्धापन दिन साजरा केला.
नॅशनल AI पोर्टल हा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग (NGD) आणि NASSCOMM या संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे. भारताशी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)  संबंधित बातम्या, मुद्दे, लेख, कार्यक्रम आणि उपक्रम इ. बाबींचे मध्यवर्ती केंद्र म्हणून AI पोर्टल कार्य करते. 30 मे 2020 रोजी हे संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या व्यक्तीला राष्ट्रीय अन्वेषण संस्था (NIA) याच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला?

1) कुलदीप सिंग
2) संजीव रंजन ओझा
3) झुल्फीकर हसन
4) एस. एस. चतुर्वेदी

उत्तर :- वाय. सी. मोदी यांच्या निवृत्तीनंतर 31 मे 2021 पासून कुलदीप सिंग (केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक) यांना राष्ट्रीय अन्वेषण संस्था (NIA) याच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या मंत्रालयाने तरुण लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी “युवा / YUVA” नामक पंतप्रधानांच्या मार्गदर्शन योजनेचा प्रारंभ केला?

1) संरक्षण मंत्रालय
2) शिक्षण मंत्रालय
3) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
4) नागरी विमानचालन मंत्रालय

उत्तर :- देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजवण्याच्या आणि जागतिक पातळीवर भारताचा आणि भारतीय लिखाणाचा ठसा उमटवण्याच्या उद्देशाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्यावतीने 29 मे 2021 रोजी तरुण आणि उदयोन्मुख लेखकांना (30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या) प्रशिक्षण देणाऱ्या “युवा / YUVA (यंग, अपकमिंग अँड व्हर्सेटाईल ऑथर्स)” नामक पंतप्रधानांच्या मार्गदर्शन योजनेचा प्रारंभ करण्यात आला. ही योजना ‘इंडिया@75’ (स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव) या प्रकल्पाचा एक भाग आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत अंमलबजावणी संस्था म्हणून नॅशनल बुक ट्रस्ट मार्गदर्शनाच्या सुस्पस्ष्ट माहितीसह टप्प्याटप्प्याने ही योजना राबविणार आहे. या योजनेच्या अंतर्गत तयार झालेल्या पुस्तकांचे नॅशनल बुक ट्रस्टकडून प्रकाशन होईल आणि त्यांचे इतर भारतीय भाषांमध्येही भाषांतर करण्यात येईल. या मार्गदर्शन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक लेखकाला मासिक 50,000 रुपये या प्रमाणे सहा महिन्यांसाठी एकत्रित शिष्यवृत्ती देण्यात येईल. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या संस्थेने विमानाच्या इंजिनसाठी लागणाऱ्या घटकांच्या उत्पादनासाठी निअर आइसोथर्मल फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले?

1) डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL)
2) सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टम (CABS)
3) एडवांस्ड सिस्टम लॅबोरेटरी (ASL)
4) एरोनॉटिकल डेवलपमेंट इस्टॅब्लीशमेन्ट (ADE)

उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) 2000 मॅट्रिक टन आयसोथर्मल फोर्ज प्रेसचा वापर करून अवघड अशा टिटॅनियम मिश्रणापासून उच्च-दाबाचे कॉम्प्रेसर (HPC) याच्या पाचही टप्प्याचे उत्पादन करण्यासाठी निअर आइसोथर्मल फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. हैदराबाद येथील DRDOच्या डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) या प्रमुख मेटलर्जिकल प्रयोगशाळेत हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
एयरोइंजिन तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आहे. या विकासासह, भारत अशा महत्वपूर्ण विमानाच्या इंजिनसाठी लागणाऱ्या घटकांच्या उत्पादनासाठीची क्षमता असणाऱ्या मर्यादित जागतिक इंजिन विकासकांच्या गटात सामील झाला आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] खालीलपैकी कोणत्या बाबीच्या संदर्भात ‘कलम 304(ब)’ ही संविधानिक तरतूद आहे?

1) गुन्हेगारी कट
2) मानहानी
3) हुंडाबळी
4) फसवणूक आणि मालमत्तेची विल्हेवाट

उत्तर :- ‘हुंडाबळी’ प्रकरणासाठी ‘कलम 304(ब)’ ही संविधानिक तरतूद भारतीय संविधानात आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] 74 व्या जागतिक आरोग्य सभेने ____ या दिवसाला ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार (NTD) दिवस’ म्हणून घोषित केले.

1) 28 जानेवारी
2) 29 जानेवारी
3) 30 जानेवारी
4) 27 जानेवारी

उत्तर :- 74 व्या जागतिक आरोग्य सभेने ‘30 जानेवारी’ या दिवसाला ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार (NTD) दिवस’ म्हणून घोषित केले. आफ्रिका, आशिया आणि अमेरिका या खंडांमधील विकसनशील प्रदेशांमध्ये दुर्लक्षित समाजांमध्ये सामान्यपणे आढळणार्‍या उष्णकटिबंधीय आजारांचे जागतिक ओझे ओळखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार (NTD) दिवस’ पाळला जाणार. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजार जिवाणू, प्रोटोझोआ, विषाणू आणि परजीवी जंत यांसारख्या विविध रोगजनकांमुळे उद्भवतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या मंत्रालयाने 11.8 कोटी विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली?

1) गृह मंत्रालय
2) आयुष मंत्रालय
3) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय
4) शिक्षण मंत्रालय

उत्तर :- 28 मे 2021 रोजी केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी माध्यान्ह भोजन योजनेसाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांसाठीच्या एका विशेष कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत, या योजनेत अंतर्भूत पदार्थ बनविण्याच्या खर्चापोटी 11 कोटी 80 लक्ष विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. देशभरातील 11 लाख 20 हजार सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या  सुमारे 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या एकदाच अमलात येणाऱ्या या विशेष कल्याणकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.
केंद्रीय सरकारने या आधी घोषित केलेल्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ याच्या अंतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रती व्यक्ती 5 किलो धान्याचे मोफत वितरण करण्याच्या योजनेच्या व्यतिरिक्त ही विशेष योजना राबविण्यात येणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] खालीलपैकी कोणती जीनस ‘अराचनोमीमस सॉसुर’ या गटामधील रातकिड्याची ओळखली गेलेली 12वी उपजात ठरली?

1) जयंती
2) प्राह
3) डौका
4) सॉरो

उत्तर :- छत्तीसगडच्या कुरा गुहांमध्ये जीनस ‘अराचनोमीमस सॉसुर’ यामधील रातकिड्याची एक नवीन उपजात शोधली गेली आहे. त्याला ‘जयंती’ असे नाव देण्यात आले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने ‘220 केव्ही श्रीनगर-द्रास-कारगिल-खालतसी-लेह प्रेषण प्रणाली’ _____ याकडे हस्तांतरित केली.

1) NTPC लिमिटेड
2) NHPC लिमिटेड
3) SJVN
4) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रिड)

उत्तर :- भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने 335 किलोमीटर लांबीची ‘220 केव्ही श्रीनगर-द्रास-कारगिल-खालतसी-लेह प्रेषण प्रणाली’ पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (पॉवरग्रिड) (ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतली सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न कंपनी) याकडे हस्तांतरित केली. ही प्रणाली लडाख प्रदेशाला राष्ट्रीय ग्रीडशी जोडते, ज्यामुळे विश्वासार्ह वीजपुरवठा होतो. त्याची बांधणी समुद्रसपाटीपासून सुमारे 3000-4000 मीटर उंचीवर केली गेली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या संस्थेने युरोपमध्ये “स्टेडफास्ट डिफेंडर 21 वॉर गेम्स” नामक लष्करी कवायतीचे आयोजन केले?

1) संयुक्त राष्ट्रसंघ
2) युरोपीय संघ
3) उत्तर अटलांटिक संधि संघटना
4) आग्नेय आशिया संधि संघटना

उत्तर :- उत्तर अटलांटिक संधि संघटना (NATO) याने युरोपमध्ये “स्टेडफास्ट डिफेंडर 21 वॉर गेम्स” नामक लष्करी कवायतीचे आयोजन केले. यात संघटनेच्या 30 सदस्य देशांनी भाग घेतला. 

# Current Affairs


 

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम