चालू घडामोडी : ४ जानेवारी २०२१

156

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 4 January 2021 | चालू घडामोडी : ४ जानेवारी २०२१

चालू घडामोडी – 

कर्नल नरेंद्र यांना “बूल” कुमार म्हणून ओळखले जात होते. ते एक भारतीय सैनिक-पर्वतारोही होते. 1984 साली ‘ऑपरेशन मेघदूत’ अंतर्गत सियाचीन हिमनदीवरील भारतीय चौकी पुनर्प्राप्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्वपूर्ण होते. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

‘निर्यातक्षम उत्पादनांवरील सीमाशुल्क व करांमध्ये सवलत’ योजना आंतरराष्ट्रीय बाजारात भारताच्या निर्यातीला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवर आकारणी, कर किंवा सीमाशुल्क परतफेड करण्यासाठी यंत्रणा तयार केली जाणार आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

DRDO यंग सायंटिस्ट लॅबोरेटरी फॉर क्वांटम टेक्नॉलॉजीज (DYSL-QT) या संस्थेच्या संशोधकांनी क्वांटम रँडम नंबर जनरेटर (QRNG) विकसित केला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

“नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘पोलीस सेवा K9s’ (PSKs) अर्थात ‘पोलीस श्वान / कुत्रे’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे. भारतात विशेष ‘पोलीस K9’ कक्षाची स्थापना नोव्हेंबर 2019 झाली. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

30 डिसेंबर 2020 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने पुढच्या 6 महिन्यांसाठी नागालँड राज्य ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित केले. ‘सशस्त्र सेना (विशेषाधिकार) कायदा’ (AFSPA) अंतर्गत संपूर्ण राज्याला सहा महिन्यांसाठी ‘अशांत क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

‘आसाम व्यवसाय सुलभीकरण (दुरुस्ती) विधेयक-2020’ याच्यानुसार, आसाम सरकार केंद्रीय सरकारकडून 0.25 टक्के अतिरिक्त कर्ज घेऊ शकणार. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

स्वदेशी विकसित 20 “स्टीम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन डॅझलर्स (लेझर डॅझलर्स)” या उपकरणाच्या पुरवठ्यासाठी भारतीय नौदलाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत करार झाला आहे. हे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी विकसित केले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

भारतीय निवडणूक आयोगात उमेश सिन्हा यांची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इतर तीन उपायुक्त सुदीप जैन, चंद्र भूषण कुमार आणि आशिष कुंद्रा हे आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

भारत देशाने वन्यजीवनाचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेल्या ‘आशिया संरक्षित क्षेत्र भागीदारी (APAP)’ याच्या सह-अध्यक्ष पदाची जबाबदारी दक्षिण कोरियाकडून घेतली. भारत नोव्हेंबर 2023 पर्यंत या पदावर राहणार आहे. APAP भागीदारीची अध्यक्षता इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN)-आशिया आणि चक्रिय पद्धतीने सदस्य देश करतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

1 जानेवारी 2021 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी भारत संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अस्थायी सदस्याच्या रुपात सहभागी होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारत, नॉर्वे, केनया, आयर्लंड आणि मॅक्सिको हे 2021 या वर्षात अस्थायी सदस्याच्या रूपात सहभागी होणार आहेत. त्याव्यतिरिक्त एस्टोनिया, नायझर, सेंट विन्सेंट, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम हेदेखील अस्थायी सदस्य आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी सराव पेपर 04-January 2021

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम