चालू घडामोडी : 6 जुन 2021

308

Current Affairs

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 1 JUNE 2021 | चालू घडामोडी : १ जुन २०२१

चालू घडामोडी – 

1] स्पेसएक्स कंपनीने _____ याच्या मदतीने ‘स्पेसएक्स CRS22’ नामक 22 वी पुरवठा सेवा मोहीम प्रक्षेपित केली.

1) कार्गो ड्रॅगन 2 कॅप्सूल
2) न्यू शेपर्ड
3) RLV-TD
4) यापैकी नाही

उत्तर :- स्पेसएक्स कंपनीने ‘कार्गो ड्रॅगन 2 कॅप्सूल’ याच्या मदतीने ‘स्पेसएक्स CRS22’ नामक 22 वी पुरवठा सेवा मोहीम प्रक्षेपित केली. या मोहिमेदवारे अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) माल पुरविण्यात आला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणता देश ‘संयुक्त राष्ट्रसंघ शाश्वत परिवहन परिषद’ 14 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित करणार?

1) बीजिंग
2) नवी दिल्ली
3) वॉशिंग्टन डी.सी.
4) ओटावा

उत्तर :- ‘संयुक्त राष्ट्रसंघ शाश्वत परिवहन परिषद’ 14 ते 16 ऑक्टोबर 2021 या कालावधीत बीजिंग (चीन) येथे होणार आहे. ही परिषद संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कार्य विभाग (DESA) यांच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या व्यक्तीने भारतीय नौदलाच्या डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ पदाचा भार स्वीकारला?

1) व्हाइस अ‍ॅडमिरल जी. अशोक कुमार
2) व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर सदाशिव पवार
3) व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल कुमार चावला
4) व्हाइस अ‍ॅडमिरल रवनीत सिंग

उत्तर :- व्हाइस अॅडमिरल रवनीत सिंग हे 01 जून 2021 पासून भारतीय नौदलाचे डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या राज्यात त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे?

1) मध्यप्रदेश
2) राजस्थान
3) गुजरात
4) महाराष्ट्र

उत्तर :- भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला नाशिक जवळ त्रिरश्मी लेणीच्या समूहात आणखी आणखी 3 गुहा सापडल्या आहेत, त्यांना ‘पांडव लेणी’ म्हणून ओळखले जाणार.
महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत. सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने त्रिरश्मी लेणी कोरण्यास मदत केली होती. त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व 200 च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक 3 एप्रिल 1916 रोजी घोषित केले आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] टाटा पॉवरच्या कथनानुसार, निळ्या रंगाचे पंख असलेला माहसीर मासा आता IUCN संस्थेच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीतून _____ या यादीत ठेवण्यात आला आहे.

1) कमी चिंताजनक
2) असुरक्षित
3) जवळपास धोक्यात असलेला
4) गंभीर धोक्यात असलेला

उत्तर :- निळ्या रंगाचे पंख असलेला माहसीर मासा आता IUCN संस्थेच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीतून ‘कमी चिंताजनक’ या यादीत ठेवण्यात आला आहे.
‘माहसीर’ मासा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्याला पाण्यातला वाघ म्हणतात. हा मासा केवळ कावेरी नदीच्या खोर्‍यात (केरळच्या पंबर, काबीनी आणि भवानी नद्यांमध्येही) आढळतो. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटंड स्पेसीज’ या यादीत कुबड असलेला भारतीय ‘माहसीर’ मासा समाविष्ट करण्यात आला आहे. या यादीत सूचीबद्ध होणे म्हणजे “लुप्त होत असलेली प्रजाती” असा अर्थ होतो 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] कोणत्या मंत्रालयाने ‘SAGE’ (सीनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन) उपक्रमाचा प्रारंभ केला?

1) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
2) सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
3) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
4) कामगार व रोजगार मंत्रालय

उत्तर :- विश्वसनीय स्टार्ट-अपद्वारे वृद्धांची काळजी घेणारी उत्पादने आणि सेवांची पूर्तता करण्यासाठी वृद्धांच्या मदतीसाठीच्या ‘SAGE’ (सीनियरकेअर एजिंग ग्रोथ इंजिन) उपक्रमाचा प्रारंभ केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने केला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय दुग्धव्यवसाय महासंघाच्या (IDF) संचालक मंडळावर निवड झाली?

1) प्रशांत कुमार
2) सिद्धार्थ मोहंती
3) संदीप बख्शी
4) डॉ. रूपिंदर सिंग सोढी

उत्तर :- अमूल या ब्रँडनावाखाली उत्पादने सादर करणाऱ्या गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ येथील व्यवस्थापकीय संचालक डॉ. रूपिंदर सिंग सोढी यांची आंतरराष्ट्रीय दुग्धव्यवसाय महासंघाच्या (IDF) संचालक मंडळावर 1 जून 2021 रोजी निवड झाली.
आंतरराष्ट्रीय दुग्धव्यवसाय महासंघ (IDF) ही जागतिक दुग्धव्यवसाय क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारी एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी, ना-नफा संस्था आहे आणि ब्रूसेल्स (बेल्जियम) येथे त्याचे मुख्यालय आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] कोणत्या मंत्रालयाने ‘हिसाब की किताब’ हे शीर्षक असलेल्या लघुपटांचे अनावरण केले?

1) कॉर्पोरेट कार्य मंत्रालय
2) शिक्षण मंत्रालय
3) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
4) यापैकी नाही

उत्तर :- केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA) यांच्या “हिसाब की किताब” हे शीर्षक असलेल्या लघुपटांच्या सहा मॉड्यूलचे अनावरण केले. आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पाचे महत्त्व, बचत, विमा योजनांचे महत्त्व, सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना इत्यादी दर्शविणार्‍या प्रत्येकी 5 मिनिटांच्या 6 लघुपटांची निर्मिती केली गेली आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] कोणत्या दिवशी ‘हिंसकतेला बळी पडलेल्या निष्पाप बालकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात येतो?

1) 03 जून
2) 06 जून
3) 04 जून
4) 05 जून

उत्तर :- दरवर्षी 4 जून या दिवशी ‘हिंसकतेला बळी पडलेल्या निष्पाप बालकांचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात येतो. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या ठिकाणी देविका नदी प्रकल्प उभारलेला आहे?

1) शिमला, हिमाचल प्रदेश
2) अल्मोरा, उत्तराखंड
3) उधमपूर, जम्मू व काश्मीर
4) बिलासपूर, हिमाचल प्रदेश

उत्तर :- जम्मू व काश्मीर प्रदेशातील उधमपूर येथे देविका नदी प्रकल्प उभारलेला आहे. देविका नदी अनेक ठिकाणी दृश्य असते आणि अदृश्य असल्याने नदीला ‘गुप्त गंगा’ असेही म्हणतात. 

# Current Affairs


mpscexams Free Current Affairs Quiz
Free Current Affairs Quiz

आजचा Current Affairs (चालू घडामोडी) चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम