एमपीएससी : इतिहासाची तयारी कशी करावी

1,319
  • प्राचीन इतिहास
  • प्राचीन इतिहासकाळातील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टे, उत्खननकत्रे, इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, इतिहासकारांची मते, साहित्य, सामाजिक पलू यांचा आढावा घ्यावा.
  • प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणे, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शालाहार, गोंड घराणे या घराण्यांचा अभ्यास करीत असताना घराणे/राजवटीचा कालखंड, संस्थापक, महत्त्वाचे राजे, शाखा व त्याचे प्रमुख, राजधानी (आर्थिक/सांस्कृतिक), आर्थिक, सामाजिक स्थिती, महत्त्वाच्या घटना – प्रमुख युद्धे या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे फायद्याचे ठरते.
  • मध्ययुगीन इतिहास
  • मध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासावर भर असावा. महत्त्वाचे राजे, लढाया, त्यांचे परिणाम, समकालीन जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे टेबल तयार करावेत.
  • या कालखंडातील साहित्यिक, कलाकार, परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने, विविध कलाशैली, वास्तूरचना यांचा आढावा घ्यावा.
  • या घटकांवर विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच असल्यामुळे नोट्स काढणे आणि त्यांची उजळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
  • मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटींचा अभ्यास-चालुक्य, यादव, बहामनी – (ईमादशाही निजामशाही आदिलशाही कुतुबशाही बरीदशाही) वरील मुद्दय़ांच्या आधारे करावा.
  • मराठा कालखंड (१६३०-१८१८)

मराठा राजवटीचा कालखंड छत्रपती शिवाजी यांच्या स्वराज्य स्थापनेपासून १८१८ पर्यंत असा आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या लढाया, तह, ठळक घडामोडी, अष्टप्रधान मंडळ, पेशव्यांची कारकीर्द महत्त्वाचे मुद्दे आहेत.

  • वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, संत त्यांच्या रचना, त्यांची शिकवण यांचा आढावा घ्यायला हवा.
  • आधुनिक इतिहास

स्वातंत्र्यपूर्व इतिहास -विश्लेषणावरून लक्षात येते की आधुनिक कालखंडाचा अभ्यास करताना स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यात महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, त्यांची कार्ये व ब्रिटिशांचे धोरण आणि त्यास भारतीयांची प्रतिक्रिया या मुद्दय़ांवर प्रश्नांचा भर अधिक असतो.

  • एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन –

देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे. महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान.

  • या विभागाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक तसेच, बिपीन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ हे पुस्तक अभ्यासोपयोगी आहे.
  • स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास –
  • या विभागामध्ये घटनानिर्मिती प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका, संयुक्त महाराष्ट्र चळवळ; त्यातील महत्त्वाचे नेते, परिषदा, पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, १९९१च्या आर्थिक धोरणाचा भारताच्या समाजावर पडलेला प्रभाव या प्रमुख मुद्दय़ांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. यासाठी बिपीन चंद्र यांचे स्वातंत्र्योत्तर भारत हे पुस्तक महत्त्वाचा स्रोत ठरते.
  • त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंच्याहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणाने चच्रेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा.
  • स्वातंत्रोत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करताना मराठवाडा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ या चळवळी महत्त्वाच्या ठरतात.
  • मराठी साहित्य संमेलने, भाषावार प्रांत रचनेची मागणी, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी प्रयत्नशील वृत्तपत्रे, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे.
    पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने विचारण्यात येतो. या घटकाच्या तयारीसाठी पुढील मुद्दे पाहायला हवेत.
सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम