गोविंद पानसरे (१९३३-२०१५) यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म: १९३३ - २०१५)

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
176

 गोविंद पानसरे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(१९३३-२०१५)

गोविंद पानसरे
गोविंद पानसरे

जन्म: २६ नोव्हेंबर १९३३

जीवन :

गोविंद पानसरे यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९३३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहता या तालूक्यातील कोल्हार या गावी झाला. ते गरीब कष्टकऱ्यांच्या परिवारात वाढले. कोल्हार येथून प्राथमिक शिक्षण व राहुरी येथून माध्यमिक शिक्षणानंतर ते उच्च शिक्षणासाठी कोल्हापूरला गेले. तिथे त्यांनी बी. ए. (ऑनर्स) व एल. एल. बी. पूर्ण केले. सुरुवातीला वर्तमानपत्र विक्रेता, मुन्सिपालिटीत शिपाई. माध्यमिक शाळा मंडळयात प्राथमिक अशा अनेक नोकऱ्या केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. सोबत ते कामगार व वकीली सुद्धा करू लागले.

पुढे चालून ते कोल्हापूरमधील एक नावजलेले वकील झाले व अनेक वर्षे कोल्हापूरातील वकीलांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिले.

चळवळ :

गोविंद पानसरे शालेय जीवनापासुनच सामाजिक चळवळीकडे आकर्षित झाले होते. सुरूवातीला राष्ट्रसेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते १० वर्षासाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्त चळवळ ते तबक्क्यांच्या हक्कासाठी लढणारे ते कार्यकर्ते होते.

ते कष्टकऱ्यांच्या शेकडो संकर्षामध्ये सहभागी झाले व अनकांचे नेतृत्त्व देखील केले. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजुर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दुध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी इ. कोल्हापुरमध टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

साहित्य :

पानसरे एक लेखक सुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तक लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानामध्ये ते अथकपणे कार्यरत होते. “शिवाजी कोण होता?” हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध लेखणांपैकी आहे.

अथक परिश्रमांती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातुन शिवाजी महराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. व १.५ लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या वाङमयाचे डॉ. अशेक घोसाळकर आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेले दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत. कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता हे पुस्तक आपल्याला शिवाजींचे दर्शन घडवले.

गोविंद पानसरे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
गोविंद पानसरे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

गोविंद पानसरे यांनी लिहिलेली काही पुस्तके :

१) अजून न स्वीकारलेला मंडल आयोग

२) अवमूल्यन : कळ सोसायची कुणी ?

३) कश्मीरबाबतच्या कलम ३७० ची कुळकथा

४) कामगार विरोधी कामगार धोरणे

५) काही कामगार कायद्यांची तोंडओळख.

६) धर्म, जात, वर्ग आणि परविर्तनाच्या दिशा

७) पंचायत राज्यांचा पंचनामा

९) मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न

१०) महाराष्ट्राची आर्थिक पाहणी पर्यायी दृष्टीकोन

११) मार्क्सवादाची तोंडओळख

१२) मुस्लिमांचे लाड

१३) राजर्षी शाहू : वसा आणि वारसा

१४) शिवाजी कोण होता?

१५) शेती धोरण परधार्जिणे

पुरस्कार व सन्मान :

२००३ साली भारतीय पोस्टाने त्याचे छायाचित्र असलेले तिकिट प्रकाशित केले.

पानसरे यांच्या नावाने कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे.

३ जून २०१५ रोजी पहिली कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार मुक्ता मनोहर यांना देण्यात आला.

१९५२ सालापासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रीय होते, त्यांनी कामगारांसाठी घर कामगार, महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी होते.

२० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचा कोल्हापूरमध्ये खून झाला.

मृत्यू : २० फेब्रुवारी २०१५

पानसरे आणि त्यांच्य पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी २ अज्ञात इसमांनी गोळीबार केला, नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने निघून गेले. ह्या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते.

पानसरे यांच्या छातीला आणि पोटाला इजा झाली होती आणि त्यांच्या पत्नीला डोक्याला इजा झाली होती. उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांच्या २० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईमध्ये निधन झाले.

संदर्भ : 

गोविंद पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents