केशवराव एम. जेधे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (जन्म : १८९६ – मृत्यू : १९५९)

(जन्म : १८९६ - मृत्यू : १९५९)

1,400

केशवराव एम. जेधे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

(जन्म : १८९६ – मृत्यू : १९५९)

 

केशवराव एम. जेधे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती (जन्म : १८९६ - मृत्यू : १९५९)

जन्म: ९ मे १८९६ – पुणे

मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ नाव : केशवराव मारोतीराव जेधे

शिक्षण : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले.

निवासस्थान : जेधे मॅन्शन या नावाने शुक्रवार पेठेत निवास होते.

वृत्तपत्रे / मासिके : शिवस्मारक नावाचे साप्ताहिक काढले ते ८ महिनेच चालले.

  • १९१८ मध्ये मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा पास झाले.
  • १९२० मध्ये त्यांचे लग्न हे सत्यशोधक समाजास मान्य असलेल्या पद्धतीनुसार झाले.
  • १९२२ मध्ये त्यांनी छत्रपती मेळा सुरु केले. यासाठी त्यांनी त्यांच्याजवळचा पैसा खर्च केला. छत्रपती मेह्याने ४ ५ वर्षे गणेशोत्सवात मोठे नाव केले. त्यामुळे जेधेचे नाव पुणे शहरात चर्चेत आले.
  • मार्च १९२५ मध्ये केशवराव हे पुणे नगरपालिकेत सदस्य म्हणून निवडून गेले. जेधे यांनी पुणे नगरपालिकेच्या खर्चाने चालणारे सार्वजनिक हौद व नळे अस्पृश्यांनाही खुले करावेत असा ठराव मांडला पण तो १२ विरुद्ध १५ मतांनी फेटाळला गेला.
  • त्यांनी महात्मा फुले यांचा पुतळा पुणे नगरपालिकेने बसवावा असा प्रस्ताव मांडला पण तोही फेटाळला गेला पण या प्रकरणामुळे त्यांचे नाव पुण्याचा सार्वजनिक जीवनात चर्चेला आले.
  • १९२५ मध्ये जवळकरांनी देशाचे दुश्मन हे छोटेखानी पुस्तक लिहिले. त्याचे प्रकाशक हे केशवराव जेधे हे व त्यांच्यावर खटला दाखल केला गेला व त्यांना दोषी ठरवून शिक्षा दिली. त्यांना ६ महिने कैद व १०० रु. दंड अशी शिक्षा झाली. या शिक्षेमुळे केशवराव जेधे यांची लोकप्रियता वाढली. (डॉ. आंबेडकरांनी वकिलपत्र घेऊन जेधे जवळकरांची निर्दोष मुक्तता केली.)
  • जेधे व जवळकर यांच्यात फुट निर्माण झाली. इ.स. १९२०-२७ पर्यंतची मैत्री ही सायमन कमीशनला सहकार्य करावे की करु नये या प्रश्नावरुन मतभेद निर्माण करणारी झाली. यात जेधे यांचे मत होते की, सायमन कमीशनला सहकार्य करु नये, तसेच जवळकरांचे मते होते की सहाकार्य करावे. कैवारी या पत्रातुन जवळकर हे दारुच्या जाहिराती प्रकाशित करू लागले ही बाबही जेधे यांना आवडली नाही व त्यांच्यात फुट पडली.
  • पुणे येथील पर्वती मंदीरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणुन झालेल्या चळवळीत जेधे सहभागी झाले होते. तसेच त्यांचा महाडच्या सत्याग्रहातही समावेश होतो. २६ डिसेंबर १९२७ महाड परिषदेत आंबेडकरांच्या विनंतीनुसार जेधे जवळकरांनी • • • भाषण केले, २५ डिसेंबरला मनुस्मृतीचे दहन महाड येथे केल्याबद्दल जेधेंनी लोकांचे अभिनंदन केले.

काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे.

१९२८-२९ या दोन वर्षात जेधे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन चाललेल्या चळवळीत सहभाग नोंदवला. २५ जुलै १९२८ रोजी जेधे बंधुनी वि. रा. शिंदेसोबत मुंबई इलाखा शेतकरी परिषद आयोजित केली. त्यात तुकडेबंदी बिल व सारावाढीचा प्रस्ताव पुढे ढकलला गेला होता. या विरोधात त्यांचा विशेष सहभाग होता. ब्राह्मणोत्तर चळवळीला विराम देऊन महर्षी वि. रा. शिंदे यांच्या प्रभावाने काँगेसच्या राष्ट्रीय राजकारणाकडे ते वळले.

  • १९३० मध्ये ते गांधीजींच्या सविनय कायदेभंगाचा चळवळीत सहभागी झाले होते. जेथेंनी स्वदेशी व बहिष्कार या विषयांवर व्याख्याने पण दिली. त्यांना या संदर्भात दोषी ठरवून ब्रिटीश सरकारने ३ महिने सक्तमजुरी व १००० रु. दंड अशी शिक्षा दिली.
  • १९३४ मध्ये केशवराव जेधे यांची मध्यवर्ती कायदेमंडळात निवड झाली.
  • महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे दोनवेळा त्यांनी अध्यक्षपद भुषविले व याकाळात महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने काँग्रेस खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोहचवण्याची प्रक्रिया त्यांच्या नेतृत्तवाखाली झाली. जेधे प्रांताध्यक्ष असताना काँग्रेसने जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकाही जिंकल्या.
  • मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री म्हणुन बाळासाहेब खेर यांनी धुरा सांभाळली. (१९३७-१९४६) पण त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कारभार शेतकरी कामगारांच्या हिताचा झाला नाही, अशी त्यांची पक्की धारण झाल्याने त्यांनी १९४६ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला व स्वतंत्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली.

सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या उजव्या बाजूला केशवराव जेधे.

  • १९५० मध्ये दाभाडी येथे भरलेल्या दुसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत जेधे काकासाहेब गाडगीळ यांच्याकडून पराभूत झाले, पण पुढे १९५४ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस शंकरराव मोरे यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा राजीनामा दिला व परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • १९५४ मध्ये ते प्रामुख्याने काकासाहेब गाडगीळ यांच्या प्रयत्नांनीच काँग्रेसमध्ये आले व १९५७ च्या निवडणुकीत बरामती मतदारसंघातुन लोकसभेवर निवडून गेले. • संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा विशेष सहभाग होता. द्विभाषिक मुंबई राज्यास त्यांचा पाठिंबा नव्हता तर मुंबईसह

-संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मताचे ते होते.

  • गोवा मुक्ती आंदोलनातील सहभाग हा महत्त्वाचा होता. जून १९५४ मध्ये गोवामुक्तीसाठी स्थापना झालेल्या सर्वपक्षीय गोवा विमोचन सहायक समितीचे केशवराव जेधे हे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी काही काळ संयुक्त महाराष्ट्र समितीचेही अध्यक्षपद भुषविले तसेच त्यांनी १९४८ मध्ये पहिल्या तमाशा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले.
  • १९५९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचे एकंदरीत सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणोत्तर चळवळ, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, गोवा मुक्तिलढा व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान राहिले.

• त्यांचा मरणापरांत पुणे येथील स्वारगेटच्या उड्डाणपूलाचे नामकरण देशभक्त कै. केशवराव जेधे उड्डाणपूल असे – करण्यात आलेले आहे.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम