लालबहादूर शास्त्री

358

लालबहादूर शास्त्री  [२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ – ११ जानेवारी, इ.स. १९६६]

हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद  येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा मृत्यू झाला.

२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले.

वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे ‘शास्त्री’ झाले .’सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स’ सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.

नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. ‘जय जवान, जय किसान’ हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

शास्त्रीजींचं निधन आकस्मिक झालं होतं. अशा वेळी लोकांची साहजिकच अपेक्षा असते की निधन कशामुळे झालं याचा तपशील आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कार्याचा परिचय सांगितला जावा. तथापि शास्त्रीजींच्या देहावसानाच्या एका ओळीच्या बातमीशिवाय आम्ही आमच्या श्रोत्यांना काहीच सांगू शकत नव्हतो; कारण आम्हालाच याबाबतीत अधिक माहिती नव्हती. शास्त्रीजींच्या मृत्यूचा तपशीलासाठी आकाशवाणीचा दूरध्वनीही खणखणू लागला. काय करावं हे सुचत नव्हतं. पण मग मी एक कागद घेतला आणि शास्त्रीजींबद्दल मला जी काही थोडी माहिती होती त्यातील मुद्दे लिहायला सुरुवात केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रत्यक्ष युद्ध चालू असताना आमच्या पुणे केंद्रावरून, दररोज संध्याकाळी आम्ही ‘जयनाद’ नावाचा ५ मिनिटांचा एक कार्यक्रम प्रसारित करीत असू. आपल्या जवानांनी युद्धभूमीवर गाजविलेल्या शौर्याच्या, त्यांच्या हौतात्म्याच्या ताज्या वीरकथांवर आधारित असा हा कार्यक्रम असे. त्यातील मला तेव्हा आठवलेल्या घटनांचा समावेश मी या मुद्दय़ात केला. याखेरीज रेल्वेमंत्री असताना अरियालूड  येथे घडलेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी तेव्हा राजीनामा दिला होता. ही घटनाही मी मुद्दय़ात घातली. त्यानंतर शास्त्रीजींच्या मृत्यूची बातमी सांगता सांगता, वरील माहितीचाही अंतर्भाव मी त्यांत करीत राहिलो. अशा रीतीने अर्धा तास मला भरून काढता आला. त्यानंतर दिल्ली केंद्रावरून शास्त्रीजींच्या मृत्यूचा तपशील आणि त्यांचे कार्य यासंबंधातील माहिती देण्यात येऊ लागली. ती आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करू लागलो.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम