PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र : नदीप्रणाली

 

महाराष्ट्र : नदीप्रणाली


१]गोदावरी नदी:

 • गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ असे म्हणतात .
 • भारतातील आणि महाराष्ट्रातील  ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.
 • सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिागिरी ” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते
 • गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. भारतातील लांबी १४६५ किमी
 • गोदावरी नदी खोरे  राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून  गोदावरी नदीने  महाराष्ट्राचे (४९ %)  क्षेत्र व्यापलेले आहे.
 •  साधारणत: आग्नेय दिशेने वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते.
 • राजमहेंद्री येथे तंबाखू संशोधन केंद्रे आहे .

   गोदावरी नदी महाराष्ट्रातील ०९ जिल्हयांतुन वाहते.

 1. नाशिक
 2. अहमदनगर
 3. ओैरंगाबाद
 4. बीड
 5. जालना
 6. हिंगोली
 7. परभणी
 8. नांदेड
 9. गडचिरोली
 •  गोदावरी नदी  ही 03 राज्यातून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश वाहते .

गोदावरी नदीच्या उपनद्या :

 1. मांजरा
 2. दारणा
 3. मुळा
 4. वर्धा
 5. वैनगंगा,
 6. पैनगंगा
 7. सिंधफणा
 8. प्रवरा
 9. इंद्रावती
 10. इरई
 11. प्राणहिता
 12. कादवा
 13. दुधना
 14. दक्षिणपूर्णा,
 15. कुंडलिका

 गोदावरी नदीवरील महत्वाचे धरण/प्रकल्प : 

 •  गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.
 • गोदावरी नदी आंध्रप्रदेश  राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात  विलीन होते .
 • गोदावरी नदीवर नाशिक  जिल्ह्यातील गंगापूर धरण हे पहिले मातीचे  धरण
 • औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण
 • नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण धर्माबाद
 • जिल्हा नांदेड  येथील बाभळी धरणआहेत.

२] कृष्णा नदी :

 •  दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे.
 • या नदीचा उगम  महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ झाला आहे .
 • कृष्णा नदी  ही 03 राज्यातून महाराष्ट्र, कर्नाटक , आंध्रप्रदेश वाहते .
 • कृष्णा नदीची लांबी १२९0 किमी आहे . त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील कृष्णा नदीची लांबी २८१ कि.मी. आहे.
 • महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा नदी पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते.
 •  कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते.
 • आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा नदी व कृष्णा यांचा संगम होतो.
 • कृष्णा नदी आंध्र प्रदेशातल्या मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते.
 • मुखाजवळ तिचा प्रवाह ३ शाखांत विभागला जातो व त्रिभुजप्रदेश निर्माण होतात.
 • कृष्णा नदीच्या खोर्‍याचा आंध्र प्रदेशांतील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणीपुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूप कमी असते.
 • आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे.
 • तुंगभद्रा नदीवरील तुंगभद्रा धरण व कोयना धरणही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहेत.
 • कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुजप्रदेश कालव्यांनी जोडले आहेत.
 • समर्थ रामदासांनी कृष्णा नदीची आरती लिहिली आहे.

कृष्णा नदीच्या उपनद्या व संगम :

 1. वेण्णा  : कृष्णा नदीस संगम माहुली येथे मिळते .
 2. कोयना :  कृष्णा नदीस कर्‍हाड येथे मिळते.
 3. वारणा : कृष्णा नदीस हरिपूर  येथे पश्चिमेकडून वारणा नदी मिळते.
 4. पंचगंगा : कृष्णा नदीस नरसोबाची वाडी येथे मिळते.
 5. तुंगभद्रा : कृष्णा नदीस संगमेश्वर येथे मिळते.

 

३]भीमा नदी :

 • भीमा नदीचा उगम महाराष्ट्रात पुण्याजवळील भीमाशंकर येथे होतो.
 • भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे.
 •  पंढरपूर येथे तिचा उल्लेख चंद्रभागा असा केला जातो.
 • भीमा नदी  ही 02 राज्यातून महाराष्ट्र, कर्नाटक  वाहते .
 • भीमा नदी  ही  कृष्णा नदीची उपनदी आहे ,परंतु भीमा कृष्णेला महाराष्ट्राच्या सरहदीबाहेर मिळत असल्याने भीमा नदीचा स्वतंत्र विचार केला जातो .
 • भीमा नदीची लांबी ७२५  किमी आहे .

४]तापी नदी :

 • तापी नदीचा उगम  मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ होतो .
 • तापी  ही नदी पश्चिम वाहिनी आहे .
 • तापी नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या तीन राज्यातून वाहते .
 • तापी नदीची एकूण लांबी ७२४ किमी  आहे .
 • 670 कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.

उपनद्या :

 1. पूर्णा
 2. गिरणा नदी
 3.  वाघूर
 • उकाई धरण
 • काकरापार धरण
 • हतनूर धरण

तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश, व गुजराथमधील सुरत जिल्ह्याचा समावेश होतो .


 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

READ  भूगोल सराव पेपर -07

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा