मराठी व्याकरण – अक्षर

 • पदसंख्या:
 • शेवटची तारीख:
910

अक्षर

1) व्यंजन + स्वर = अक्षर
2) स्वर = अक्षर
3) व्यंजन + स्वर + स्वरादी = अक्षर
– पूर्ण उच्चारला जाणारा वर्ण म्हणजे अक्षर होय.
– ध्वणींच्या किंवा आवाजाच्या खुणाना अक्षर म्हणतात.
– ध्वनीमय संकेतांच्या लेखनखुणा म्हणजे अक्षर होय.
– अक्षरामध्ये सर्व स्वर व स्वर युक्त व्यंजने यांचा समावेश होतो.

 

1) स्वर = अक्षर 

   अ –  अ
   आ – आ
   ऊ – ऊ 
एक अक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहिली जातात.

 

2) व्यंजन + स्वर = अक्षर

   ह् + ऋ = हृदय
   क् + ऋ = कृ
   क् + लृ = क्लृ
   च् + आ = चा

 

3) व्यंजन + स्वर + स्वरादी = अक्षर

   त् + अ + विसर्ग = स्वत:
   द् + उ + विसर्ग = दु:ख

 

जोडाक्षर

1) व्यंजन + व्यंजन + स्वर = जोडाक्षर
2) व्यंजन + व्यंजन + व्यंजन + स्वर = जोडाक्षर
 — संयुक्त व्यंजनामध्ये / द्वित्त व्यंजनामध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा त्यास जोडाक्षर असे म्हणतात.
उदा. 1) सख्य = स् + अ + ख् + य् + अ 
     2) जोत्स्ना = ज् + ओ + त् + स् + न् + आ
     3) क्षार = क् + ष् + आ + र् + अ

जोडाक्षर लिहिण्याच्या दोन पध्दती आहेत :-

1) उभी लेखन पध्दती :-
2) आडवी लेखन पध्दती :-
उदा. आक्का, विठ्ठल, कट्टा

 

‘र’ हे व्यंजन जोडण्याच्या 4 पध्दती आहेत :-

अ) व्यंजनापूर्वी ‘र’ आल्यास :
 1) रकार (-) :        2) रफार () :
ब) व्यंजनानंतर ‘र’ आल्यास :
 1) रकार () :         2) रकार () :  
अ)व्यंजनापूर्वी ‘र’ आल्यास :
1) रकार (-) :- 
-‘ह’ आणि ‘य’ पूर्वी ‘र’ आल्यास रकार हे चिन्ह वापरतात.
उदा. कुर्‍हाड, र्‍हस्व, कोपर्‍यात, सुर्‍या
2) रफार :-
-‘ह’ आणि ‘य’ सोडून इतर व्यंजनापूर्वी ‘र’ आल्यास रफाराचे चिन्ह वापरतात.
-रफार युक्त अक्षरे हे जोडाक्षरे असतात.
-रफार ज्या अक्षरावर उच्चारला जातो त्याच्या पुढील अक्षरावर तो दिला जातो.
-रफारच्या अलीकडील अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.
उदा. तीर्थ, ऊर्जा, पूर्व, मूर्ख, सूर्य, आशीर्वाद

 

अपवाद :  

1) दुर (वाईट) :- दुर्गंध, दुर्गती, दुर्दैव, दुर्बल, दुर्जन, दुर्भाग्य, दुर्वासना.
2) निर (निघून गेलेला, नसलेला, वाईट) :- निर्घुन, निर्धाव, निर्णायक, निर्लज्ज, निर्भीड, निर्मनुष्य
3) चतुर (चार) :- चतुर्वर्ण्य, चतुर्दश, चतुर्दशी, चतुर्थी
4) बहिर (बाहेर) :- बहिर्गोल, बहिर्वक्र, बहीर्दिशा 

 

ब) व्यंजनानंतर ‘र’ आल्यास :

1) रकार :- 
ट, ठ, ड, ढ या व्यंजनांनंतर ‘र’ आल्यास () हे चिन्ह वापरतात.
उदा. ट्रक, ड्रायवर, ड्रम, राष्ट्र
2) रकार :-
ट, ठ, ड, ढ हे व्यंजनेसोडून इतर व्यंजनांनंतर ‘र’ आल्यास () हे चिन्ह वापरतात.
उदा. क्रम, प्रसाद, द्रव, प्रकार, ग्रास, प्रकाश

 

स्र आणि स्त्र मधील फरक :-

1) स्र :- स् + र् + अ
उदा. अजस्र, चतुरस्र, सहस्र, स्रोत, रक्तस्राव, हिंस्र
2) स्त्र :- स् + त् + र् + अ 
उदा. स्त्री, इस्त्री, मिस्त्री, शस्त्र, अस्त्र, शिरस्त्राण  
जोडाक्षरांची उदा. :-
– तीर्थ, प्रतीज्ञा, परीक्षा, अभीष्ट, प्रावीण्य, ईश्वर, धूम्र, पूज्य.
– वरील सर्व शब्द तत्सम आहेत.

 

‘न’ आणि ‘ण’ मधील फरक :-

शब्द
अर्थ
शब्द
अर्थ
खून
हत्या
खुण
चिन्ह
घन
दाट
घण
हातोडा
जान
जीव
जाण
ओळख
तन
शरीर
तण
गवत
तरून
पोहणे
तरुण
जवान
निर्नायक
नायक नसलेला
निर्णायक
अंतिम
मन
इंद्रीय
मण
वजन
वरून
वरच्या बाजूने
वरुण
पाऊस

शब्द योग्य वर्ण रचनेप्रमाणे लावणे किंवा मुलध्वनींची संख्या मोजणे

1) सुक्ष्मदर्शी = स्+उ+क्+ष्+म्+अ+द्+अ+र्+श्+ई = 11
2) राम वनात गेला = र्+आ+म्+अ+व्+अ+न्+आ+त्+अ+ग्+ए+ल्+आ = 14
3) वृत्तनिवेदक = व्+ऋ+त्+त्+अ+न्+इ+व्+ए+द्+अ+क्+अ = 13
4) सिंह = स्+इ+अनुस्वार+ह्+अ = 5 
5) अविच्छिन्न = अ+व्+इ+च्+छ़+इ+न्+न्+अ = 9

 

‘अ’कार विल्हेक्रम-

 

1) बछडा, बडतर्फी, बलोपासना, बत्तीस
क्रम – 
 • बछडा 
 • बडतर्फी
 • बत्तीस 
 • बलोपासना
2) पत्र, पराजित, पाहुणा, पत्थर
क्रम –
 • पत्थर 
 • पत्र 
 • पराजित
 • पाहुणा 
3) धमकी, धमाका, धन, धनगर
क्रम –
 • धन
 • धनगर
 • धमकी
 • धमाका
4) अंदाज, अक्कल, अक्कस, अंमल
क्रम –
 • अंदाज
 • अंमल
 • अक्कल
 • अक्कस  
5) देऊन, दृश्य, दुष्यण, दुर्ग, दू:खी 
क्रम – 
 • दू:खी
 • दुर्ग
 • दुष्यण 
 • दृष्य 
 • देऊन

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents