One Liners : एका ओळीत सारांश

91

एका ओळीत सारांश, 25 मे 2021

Admin

दिनविशेष

  • अस्वशासित प्रदेशांच्या लोकांशी असलेला एकतेचा आंतरराष्ट्रीय आठवडा – 25-31 मे.

पर्यावरण

  • ______, जगातील सर्वात सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखी जो कॉंगो देशाच्या गोमा शहराजवळ आहे, त्याचा 23 मे 2021 रोजी अचानक उद्रेक झाला – माउंट निरागोंगो.
  • भोपाळच्या भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने मिझोरममध्ये शोधलेली आफ्रिकन व्हायलेट या वनस्पतीची नवीन प्रजाती – “डिडायमोकार्पस विक्कीफंकि.

आंतरराष्ट्रीय

  • कृषी क्षेत्रात एक आदर्श परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने भारत आणि इस्त्रायल हे दोनही देश मिळून भारतात “भारत-इस्त्रायल कृषी प्रकल्प उत्कृष्टता केंद्र” आणि “____” यांची अंमलबजावणी करीत आहेत – इंडो- इस्त्राल विलेज ऑफ एक्सलन्स.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या _____ या संस्थेने जगातील सर्वाधिक असुरक्षित लोकांपर्यन्त जीवनावश्यक अन्न पोचविण्यासाठी त्याची संघर्षाप्रती संवेदनशीलता आणि प्रतिबंध क्षमता वाढविण्यासाठी इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप (ICG) यांच्यासोबत धोरणात्मक भागीदारी केली – जागतिक अन्न कार्यक्रम (WFP).
  • ____ या संस्थेने आशिया खंडातील प्रथम इंटरनॅशनल मेमरी स्टडीज कार्यशाळा आयोजित केली – इंडियन नेटवर्क फॉर मेमरी स्टडीज (INMS), IIT मद्रास.
  • पूर्व भूमध्य क्षेत्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक कार्यालयाने घोषित केलेल्या ‘जागतिक तंबाखू बंदी दिवस 2021 पुरस्कार’चे विजेता – पाकिस्तान.

राष्ट्रीय

  • आकांक्षी जिल्ह्यांमध्ये वन धन योजना राबविण्यासाठी TRIFED संस्थेने ____ सोबत करार केला – नीती आयोग.
  • ‘भारत जैवविविधता पुरस्कार 2021’ हा केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, _____ आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) या संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे – राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण.

व्यक्ती विशेष

  • अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, ज्यांचे 23 मे 2021 रोजी निधन झाले – शेखर बसू.
  • ____ यांची आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण मंडळ (INCB) याच्या अध्यक्ष पदी निवड झाली आणि यासह त्या विएन्ना येथील INCB संस्थेचे प्रमुख म्हणून काम करणारी पहिली भारतीय आणि या पदावर कार्यरत असलेली दुसरी महिला ठरली – जगजित पवाडिया.

राज्य विशेष

  • आसाम सरकारने ____ यांच्याकडे मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली – समिर सिन्हा (पबन बरठाकूर यांच्या जागी).

सामान्य ज्ञान

  • आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) – स्थापना: 5 ऑक्टोबर 1948; स्थान: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.
  • संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP किंवा संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण) – स्थापना: 5 जून 1972; मुख्यालय: नैरोबी, केनिया.
  • आंतरराष्ट्रीय जल-सर्वेक्षण संघटना (IHO) – स्थापना: 21 जून 1921; स्थान: मोनाको.
  • आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण (ISA) – स्थापना: 16 नोव्हेंबर 1994; मुख्यालय: किंग्स्टन, जमैका.
  • आंतरराष्ट्रीय समुद्र शोध परिषद (ICES) – स्थापना: 22 जुलै 1902; मुख्यालय: कोपेनहेगन, डेन्मार्क.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम