करोनाविरोधातील लढय़ात पंतप्रधानांचे महत्वाचे संदेश काय करावे व काय करू नये ?

करोनाने अवघ्या मानवजातीला घेरले असून, संपूर्ण जग आपत्तीला सामोरे जात आहे. भारतासारख्या १३० कोटींच्या, विकासाकडे वेगाने धाव घेणाऱ्या देशाला बेफिकीर राहता येणार नाही. या साथरोगाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी काही संकल्प करण्याची गरज आहे. त्यानुसार रविवारी २२ मार्चला लोकांनी स्वत:च घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. या साथरोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने या विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारी, २२ मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ  वाजेपर्यंत जनतेने स्वत:हून संचारबंदी पाळावी, असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासीयांना केले. ‘जनता संचारबंदी’च्या काळात कोणीही घरातून बाहेर पडू नका. चौकाचौकात एकत्र येऊ  नका. बाजारात विनाकारण फिरू नका. घराच्या-सोसायटीच्या आवारातही एकत्र येऊ  नका’, अशी सूचना मोदींनी केली.

जनता संचारबंदी’ म्हणजे संकटाच्या काळात आत्मसंयम दाखवण्यासाठीची परीक्षा असेल. देशहितासाठी हे कर्तव्य पार पाडा. या संदर्भात विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या संघटनांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यांनी ‘जनता संचारबंदी’चा प्रसार केला तरी त्याचा मोठा फायदा होईल. लोकांनी आपल्या संपर्कातील किमान दहा जणांना फोन करून करोनामुळे उद्भवलेल्या संकटाची माहिती द्यावी, असे मोदी म्हणाले.

काही दिवसांपासून रुग्णालय, विमानतळ, विविध कार्यालये,  अगदी चौकाचौकांत लाखो जनसेवक कार्यरत आहेत. डॉक्टर, परिचारिका, सरकारी कर्मचारी, पोलीस, रेल्वे- बस कर्मचारी, घरपोच सेवा देणारे लोक स्वत:ची पर्वा न करता जनतेची सेवा करत आहेत. ही सेवा सामान्य म्हणता येणार नाही. करोनाची बाधा होण्याचा धोका असतानाही ते काम करत आहेत. हे खरे राष्ट्ररक्षक आहेत. अशा व्यक्ती, संघटनांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. या राष्ट्ररक्षकांना रविवारी धन्यवाद द्यावेत. संध्याकाळी पाच वाजता घराच्या बाल्कनीत, खिडकीत उभे राहून पाच मिनिटांसाठी टाळी, घंटी, थाळी वाजवून आभार माना. स्थानिक प्रशासनानेही सायरन वाजवून लोकांना आभार प्रदर्शनाच्या वेळेची सूचना द्यावी, असेही आवाहन मोदी यांनी केले.

पंतप्रधानांचे महत्वाचे संदेश काय करावे व काय करू नये ?

साठेबाजी करू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधनकाही ठळक मुद्दे

 1. मला तुमचे पुढचे काही आठवडे पाहिजेत – नरेंद्र मोदी
 2.  भारत सरकार जागतिक महामारीवर पूर्ण नजर ठेऊन
 3.  जगातल्या अनेक देशांनी आपल्या नागरिकांना जास्तीत जास्त आयसोलेट (बंदिस्त) करुन ठेवलं आणि त्यांना ताबा मिळवण्यावर प्रभावी यश
 4.  भारतासारख्या विकसनशील राष्ट्राला कोरोनाशी लढणं अतिशय महत्वाचं आणि आव्हानात्मक
 5.  संकल्प आणि संयम ठेवणं सर्वाधिक महत्वाचं – मोदी
 6. आपल्या कर्तव्यांचं पालन करुयात
 7. केंद्र आणि राज्य सरकारच्या दिलेल्या निर्देशांचं १०० टक्के पालन करुयात
 8.  आपण स्वता संक्रमित होण्यापासून वाचू आणि दुसऱ्यांनाही वाचवुयात
 9.  जागतिक महामारीच्या काळात आपण स्वस्थ तर जग स्वस्थ हाच उपाय काम करतो
 10. गर्दीत जाणं टाळणं, गर्दी करणं टाळणं गरजेचं
 11.  मला काय होतंय, मी ठीक आहे, ही भावना चुकीची
 12.  येणारे काही आठवडे आपण अत्यावश्यक कामासाठीच बाहेर निघा
 13.  घरातून काम करण्याला प्राधान्य द्या – मोदी
 14.  सरकारी सेवा, मिडीया, डॉक्टर्स यांना वगळून इतरांनी बंदिस्त करुन घ्यावं
 15.  वरिष्ठ नागरिकांनी येणारे ३ ते ४ आठवडे घराबाहेर निघूच नका
 16.  मला जनता कर्फ्यूची आवश्कयता आहे जो जनतेकडून जनतेसाठी लावलेला कर्फ्यू
 17.  २२ मार्च सकाळी ७ ते संध्याकाळी ९ पर्यंत जनता कर्फ्यूचं पालन करा
 18.  जनता कर्फ्यूचं नेतृत्व करावं
 19. एसीसी, एनएसएस यांना मोदींनी केलं आवाहन
 20.  आजपासून रविवारपर्यंत जनता कर्फ्यूबाबत जागरुक करा
 21.  दररोज नव्या १० जणांना फोन करुन सांगा २२ गेल्या २ महिन्यांपासून डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कामगार, वायू कर्मचारी, पोलिस, मिडीया, रेल्वे, होम डिलीव्हरी करणारी मंडळी दुसऱ्यांची सेवा करतायत, या सेवा देणाऱ्यांना मोदींकडून शाब्बासकी – राष्ट्ररक्षकाची उपमा
 22.  व्यापारी आणि उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मदत करावी
 23.  देशात दूध, औषधं, खाण्यापिण्याच्या गोष्टी बंद होणार नाहीत
 24.  नागरिकांनो जरुरी वस्तूंचा संग्रह करु नका
 25.  कोरोनापासून वाचवण्यालाचा सर्व प्राधान्य
 26.  वैश्विक महामारीच्या काळात मानव जात, भारत देश विजयी होईल

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा