व्यक्तीविशेष : यशवंतराव चव्हाण
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
यशवंतराव बळवंतराव चव्हाण
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला.
सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र हे एक हजार वस्तीचे खेडे त्यांचे जन्मस्थान.
त्यांचे वडील यशवंतराव लहान बालपणी वारले. त्यांच्या आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून घर चालवले.
यशवंतराव या पुत्राने खूप शिकावे ही त्या माऊलीची इच्छा. यशवंतरावांनी शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.
त्यांनी संगीत, भजन-कीर्तन यांचाही स्वाद घेतला; कऱ्हाड येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्य टिळक, ना. गोखले यांची भाषणे ऐकली.
त्यांनी सालसेत असताना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली.
ते येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम. जोशी यांच्यासारखे नेते तेथे होते.
तुरुंगामध्ये राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा होत. यशवंतरावांना त्या वयातच विचारवंत, साहित्यिक यांच्या ग्रंथांसंबंधी आकर्षण वाटू लागले. त्यांनी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयामध्ये असताना त्यांचा व्यासंग वाढवला. ना.सी. फडके यांच्यासारखे नामवंत साहित्यिक प्राध्यापक होते.
त्यांनी ते बी.ए., एल्.एल्. बी. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात भूमिगत होऊन कार्य केले.
त्यांनी १९४७ नंतर मंत्री, मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि वित्तमंत्री ही पदे समर्थपणे सांभाळली. त्यांनी केंद्र सरकारमध्ये पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली कार्य केले.
यशवंतराव ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळींपासून अलिप्त राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याव्यतिरिक्त त्यांनी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक वेळा काम केले आणि गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले आणि नंतर ते भारताचे उपपंतप्रधान झाले. .
यशवंतराव चव्हाण यांनी २५ नोव्हेंबर १९८४ रोजी जगाचा निरोप घेतला.