चालू घडामोडी : 11 फेब्रुवारी 2020

119

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 11 Februari 2020 | चालू घडामोडी : 11 फेब्रुवारी 2020

चालू घडामोडी –  स्थलांतरित प्रजातींबाबत संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्‌घाटन

  •  परिषदेचे यजमानपद म्हणजे भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल: प्रकाश जावडेकर
  •  संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत करार केलेल्या देशांची, स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींचे संवर्धन या विषयावर परिषद होणार आहे.
  •  गुजरातमधल्या गांधीनगर येथे 17 ते 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणाऱ्या या परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवमान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
  •  या परिषदेचे यजमानपद म्हणजे भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
  •  15 आणि 16 फेब्रुवारीला परिषदपूर्व बैठका होणार आहेत. परिषदेला 130 देशांचे प्रतिनिधी, तज्ञ, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.

# Current Affairs


चालू घडामोडी – केरळमधली 2,130 बेटे ‘किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र’ अंतर्गत संरक्षित

केरळमधली 2,130 बॅकवॉटर बेटे ‘किनारपट्टी नियंत्रण क्षेत्र’ (Coastal Regulation Zone -CRZ) अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहेत आणि त्याद्वारे त्या बेटांवरील विकासाच्या कामांवर अंकुश लावला जाणार आहे.

 या बेटांवर हाय टायड लाईन (HTL) ते किनाऱ्याकडील बाजूच्या 50 मीटरपर्यंतच्या प्रदेशादरम्यान कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. वसंत ऋतुत येणाऱ्या भरतीवेळी समुद्राचे पाणी जास्तीत जास्त ज्या सीमेपर्यंत पोहोचते त्याला हाय टायड लाईन (HTL) म्हणतात.

 ठळक बाबी

बेटांच्या यादीमध्ये मुलावूकड, चंदामंगलम, कोथड, पिझला आणि एर्नाकुलमचे कदममाकुडी, अलाप्पुझामधली 474 बेटे, कोल्लममधली 184 बेटे, तिरुवनंतपुरममधली 43 बेटे आणि इतर बेटांचा समावेश आहे.

 या क्षेत्रातल्या केवळ स्थानिकांना त्यांच्या राहत्या घरांची दुरुस्ती व पुनर्बांधणीस परवानगी दिली जाणार आहे. 50 मीटरच्या मर्यादेपलीकडे स्थानिक संस्था स्थानिक मंडळाच्या परवानगीने नवीन राहत्या घरांची निर्मिती करु शकणार.

 केरळ किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणासाठी (KCZMA) नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज (तिरुवनंतपुरम) ही संस्था या बेटांची यादी तयार केली.

# Current Affairs


चालू घडामोडी –  92 वे ऑस्कर अवॉर्डस 2020 जाहीर

  • 92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर)हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.
  •  दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला.
  •  यंदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला
  • या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.

पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे:

  1. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्वेगरला (Judy)
  2. सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)
  3. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो यांना (पॅरासाईट)
  4. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – जोकर
  5. सर्वोत्कृष्ट मूळ गीत – ‘आय एम गॉन अ लव्ह मी अगेन’ (रॉकेटमॅन)
  6. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)
  7. सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा – बॉम्बशेल
  8. सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – फोर्ड व्हर्सेस फेरारी
  9. सर्वोत्कृष्ट छायांकन – रॉजर डेकिन्स (१९१७)
  10. सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – १९१७
  11. सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फेरारी
  12. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)
  13. सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)
  14. सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी
  15. सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जॅकलिन दुरान (लिटील वूमन)
  16. सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड
  17. सर्वोत्कृष्ट ‘लाईव्ह ऍक्शन’ लघुपट – द नेबर्स विंडो
  18. सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) – ताइका वाईतीती (जोजो रॅबिट)
  19. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – बाँग जून हो (पॅरासाईट)
  20. सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह
  21. सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी ४
  22. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)

# Current Affairs


चालू घडामोडी –  रविंद्र वायकर मुख्यमंत्री सचिवालयाचे मुख्य समन्वयक

  • मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रमुख समन्वयक म्हणून आमदार रविंद्र वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. रवींद्र वायकर यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य कक्षातील अधिकारी-कर्मचारी यांची कुमक देण्यात येणार आहे.
  •  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रालयात भेटण्याकरिता संपूर्ण राज्यातून मोठया प्रमाणावर नागरिक निवेदने, तक्रारी, गाऱ्हाणी घेवून येत असतात. या सर्व नागरिकांची निवेदने, तक्रारी व गाऱ्हाणी समजावून घेवून मार्गी लावण्याकरिता मुख्यमंत्री सचिवालयात जेष्ठ व अनुभवी व्यक्तीची आवश्यकता असल्यामुळे ही जबाबदारी रविंद्र वायकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  •  जिल्हास्तरावर व विभाग स्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरिता विभागीय मुख्यमंत्री सचिवालय सुरू करण्यात आले आहे. त्याची व्याप्ती जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या सर्व कार्यालयांच्या समन्वयासाठी देखील प्रशासकीय अनुभव असणारे रवींद्र वायकर काम पाहणार आहेत. रवींद्र वायकर यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य कक्षातील अधिकारी-कर्मचारी यांची कुमक देण्यात येणार आहे.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम