चालू घडामोडी : 20 मार्च 2020

124

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 20 March 2020 | चालू घडामोडी : २०मार्च २०२०

चालू घडामोडी – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द- शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषदेत घोषणा.

  •  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत- शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची पत्रकार परिषदेत घोषणा.
  •  बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील शासनाने हा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येणार
  •  इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या उर्वरित विषयांच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार. इयत्ता दहावीचे दोन पेपर नियोजित वेळेप्रमाणे येत्या शनिवारी आणि सोमवारी वेळापत्रकानुसार होणार.
  •  दहावीच्या परीक्षेसंबधित आवश्यकता असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरीहून काम करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी आणि शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करा- शिक्षणमंत्री

# Current Affairs


चालू घडामोडी – गुजरातच्या कंपनीला करोना व्हायरसचे टेस्ट किट बनविण्याचा परवाना

  • अहमदाबाद येथील कोसारा डायग्नोस्टिक या कंपनीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून करोनाव्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळाला आहे. भारतात करोना व्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. या किटवद्वारे अडीच तासामध्ये करोना व्हायरस संबधित चाचणी होवू शकते असा दावा या कंपनीने केला आहे.
  • कोसारा डायग्नोस्टिक्स ही कंपनी अमेरिकेच्या को-डायग्नोस्टिक्स इंक आणि भारतीय अंबालाल साराभाई एंटरप्रायजेस या अन्य कंपन्यासोबत काम करते.
  • कोसारा डायग्नोस्टिक्सने परवाना मिळवण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे एका महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मंगळवारी त्यांना याचा परवाना मिळाला.
  • अहमदाबाद मिररने या संदर्भात वृत्त दिले आहे.
    कोविड १९ वर कोणतीही लस आतापर्यंत उपलब्ध नसल्याने त्याचे निदान करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या किटची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आमच्य़ाकडे आहे अशी माहिती को. डायग्नोस्टिक्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड्वेइट इगन यांनी दिली आहे.
  • भारतात १९५ जणांना आत्तापर्यंत या विषाणूची लागण झाल्याचे आढळले असून एकूण पाच जणांनी प्राण गमावला आहे. तसेच राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांनी येत्या रविवारी २२ मार्चला स्वत:हून सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत घराबाहेर न पडता या जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन

  • भारताचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
  • भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ अनुभवताना आघाडीवीर म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
  • १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
  • पश्चिम बंगालमधील जलपायगुरी येथे २३ जून १९३६ जन्मलेल्या बॅनर्जी यांचे कुटुंब फाळणीच्या आधी जमशेदपूर येथे राहात होते.
  • १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रान्सविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवणारा गोल लगावला होता. त्याचबरोबर १९६२च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
  • भारतीय फुटबॉलमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) बॅनर्जी यांचा २०व्या शतकातील भारताचे महान खेळाडू म्हणून गौरव केला होता.
  • तसेच त्यांना विशेष सन्माननीय पदकही फिफाकडून देण्यात आले होते. बॅनर्जी यांनी १९५६च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
  • १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये ते भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार होते. दुखापतीमुळे १९६७ मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती पत्करल्यानंतर ते प्रशिक्षणाकडे वळले. प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपल्या संघाला ५४ विजेतेपदे मिळवून दिली.

# Current Affairs


चालू घडामोडी –संस्कृत विद्यापीठांचे विधेयक मंजूर

  • संसदेत केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक मंजूर झाले.
  • त्यानुसार दिल्लीचे राष्ट्रीय संस्कृत संस्थान, श्री लाल बहादूर शास्त्री विद्यापीठ आणि तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाची ओळख यापुढे केंद्रीय विद्यापीठ म्हणून होणार आहे.
  • गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेने हे विधेयक मंजूर केले होते.
  • त्यानंतर या आठवड्याच्या सुरूवातीस काही दुरुस्त्यांसह हे विधेयक सभागृहातील मतदानाद्वारे मंजूर झाले होते. या दुरुस्तीसह हे विधेयक शुक्रवारी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम