Current Affairs | चालू घडामोडी : 04 जुन 2021

264

Current Affairs | चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Current Affairs : 4 JUNE 2021 | चालू घडामोडी : ४ जुन २०२१

चालू घडामोडी – 

1] कोणत्या कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कोविड-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी ‘एक्सरेसेतू / XraySetu’ नामक एक AI-चालित डिजिटल मंच विकसित केला?

1) आर्टपार्क (AI अँड रोबोटिक्स टेक्नॉलजी पार्क)
2) स्पेक इंडिया
3) क्वेटेक
4) वेबट्यूनिक्स AI

उत्तर :- आर्टपार्क (AI अँड रोबोटिक्स टेक्नॉलजी पार्क) या तंत्रज्ञान कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागात क्ष-किरणाद्वारे घेतलेल्या छातीच्या छायाचित्रावरून कोविड-19 रुग्णांचा शोध घेण्यासाठी ‘एक्सरेसेतू / XraySetu’ नामक कृत्रिम बुद्धीमत्तेचा (AI) वापर करणारा एक डिजिटल मंच विकसित केला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

2] कोणत्या व्यक्तीची ‘डिजिटल मीडिया कंटेंट रेग्युलेटरी काऊंसिल’ (DMCRC) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली?

1) विक्रमजित सेन
2) आशिष चौहान
3) दिपक मिश्रा
4) रंजन गोगोई

उत्तर :- न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) विक्रमजित सेन हे इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन (IBF) याच्या ‘डिजिटल मीडिया कंटेंट रेग्युलेटरी काऊंसिल’ (DMCRC) या नव्याने तयार झालेल्या स्वयं-नियामक मंडळाचे अध्यक्ष आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

3] कोणत्या खेळाडूने ‘आशियाई अव्यवसायी मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2021’ या स्पर्धेच्या 91 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक जिंकले?

1) वासिली लेविट
2) अमित पन्हाळ
3) विकास कृष्ण यादव
4) संजीत कुमार

उत्तर :- भारतीय हेवीवेट मुष्टियोद्धा संजीत कुमारने दुबई (संयुक्त अरब अमिराती) येथे आयोजित केलेल्या ‘आशियाई अव्यवसायी मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2021’ या स्पर्धेच्या पुरुषांच्या 91 किलोग्राम वजन गटाचे सुवर्णपदक जिंकले. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

4] कोणत्या दिवशी ‘जागतिक सायकल दिवस’ साजरा करतात?

1) 31 मे
2) 01 जून
3) 02 जून
4) 03 जून

उत्तर :- दरवर्षी 03 जून या दिवशी ‘जागतिक सायकल दिवस’ साजरा करतात. शारीरिक आरोग्य टिकवून ठेवण्यामध्ये सायकल चालवणे किती लाभदायक असते याकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस पाळतात. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

5] कोणती व्यक्ती राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याचे नवीन अध्यक्ष आहे?

1) अरुण मिश्रा
2) प्रफुल्ल चंद्र पंत
3) ज्योतिका कालरा
4) ज्ञानेश्वर मनोहर मुलाय

उत्तर :- भारताचे राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांची भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग (NHRC) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.
‘मानवी हक्क संरक्षण कायदा 1993’ अन्वये राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगास या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले गेले आहेत. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

6] _______ ‘SATAT / सतत’ म्हणजेच ‘परवडण्याजोग्या वाहतुकीच्या दिशेनी शाश्वत पर्याय’ या उपक्रमाची अंमलबजावणी करीत आहे.

1) रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय
2) पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय
3) रेल्वे मंत्रालय
4) जलवाहतुक मंत्रालय

उत्तर :- भारत सरकारचा ‘SATAT / सतत’ (Sustainable Alternative Towards Affordable Transportation) म्हणजेच ‘परवडण्याजोग्या वाहतुकीच्या दिशेनी शाश्वत पर्याय’ या उपक्रमाच्या अंतर्गत देशभरात संकुचित जैव-वायू निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. कृषि-कचर्‍यापासून जैव-वायू (बायोगॅस) तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यासाठी भारत सरकारचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय देशातील प्रमुख तेल व वायू विपणन कंपन्यांसोबत सामंजस्य करार करीत आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

7] कोणत्या समितीने व्हेरिएबल कॅपिटल कंपन्या (VCC) यांच्या व्यवहार्यतेबाबत अहवाल सादर केला?

1) भुरेलाल समिती
2) अभिजित सेन समिती
3) अबीद हुसेन समिती
4) डॉ. के. पी. कृष्णन तज्ज्ञ समिती

उत्तर :- डॉ. के. पी. कृष्णन यांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये व्हेरिएबल कॅपिटल कंपन्या (VCC) यांच्या व्यवहार्यतेबाबतचा अहवाल आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) याचे अध्यक्ष इंजेती श्रीनिवास यांच्याकडे सोपवला. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

8] रॅकोणत्या कंपनीच्या माध्यमातून कोविड-19 विरोधी लढ्यात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या ‘प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज’ विमा योजनेची अंमलबजावणी होत आहे?

1) न्यू इंडिया अॅश्योरन्स कंपनी
2) द ओरिएंटल इन्शुरेंस कंपनी
3) युनायटेड इंडिया इन्शुरेंस
4) न्यू इंडिया इन्शुरेंस

उत्तर :- कोविड-19 विरोधी लढ्यात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय सरकारने 30 मार्च 2020 रोजी प्रारंभ केलेली ‘प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज’ ही विमा योजना सुरुवातीला 90 दिवसांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली होती आणि या योजनेद्वारे सामाजिक आरोग्य सेवा आणि खासगी आरोग्य कर्मचारी यांच्यासह सरकारने कोविड-19 बाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या आणि कोविड बाधितांच्या थेट संपर्कात आले असण्याची शक्यता असल्यामुळे धोक्याच्या छायेत असणाऱ्या सर्व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले होते. ‘न्यू इंडिया अॅश्योरन्स (NIACL) कंपनीच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होत आहे.
केंद्रीय सरकारकडून ‘प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज’ याचा विस्तार वाढवून त्याअंतर्गत कोविड-19 विरोधी लढ्यात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले विमा संरक्षण 24 एप्रिल 2021 पासून आणखी एका वर्षासाठी वाढविण्यात आले आहे.  

# Current Affairs


चालू घडामोडी – 

9] ‘लिटोरिया मीरा’ नामक जात ही _____ या प्रजातिमधील एक आहे.

1) साप
2) फूल
3) बेडूक
4) मासे

उत्तर :- ‘लिटोरिया मीरा’ नामक जात ही बेडूक या प्रजातिमधील एक आहे. ही जात न्यू गिनी देशाच्या वर्षावनात आढळून आली. या नवीन बेडकाच्या शरीराचा रंग पूर्णपणे चॉकलेट / गडद कथ्था आहे. हा बेडकांच्या जीनस ‘ऑस्ट्रेलियन लिटोरिया’ या कुटुंबामधील अलिखित वर्ण असलेला बेडूक आहे. 

# Current Affairs


चालू घडामोडी – 

10] कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला?

1) रसायन व खते मंत्रालय
2) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
3) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
4) पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय

उत्तर :- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘सीड मिनीकीट’ कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत जास्त उत्पादन देणार्‍या डाळी व तेलबिया पिकांच्या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांमध्ये वितरित केले जात आहे. 

# Current Affairs


#आजचा Current Affair चा पेपर सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम