अर्थव्यवस्थांचे प्रकार

391

अर्थव्यवस्थांचे प्रकार

(Types of economies)

अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण दोन निकषांच्या आधारावर केले जाते
१. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार, 
२. विकासाच्या अवस्थेनुसार.
उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार :

भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. अर्थव्यवस्थेत ही साधने कोणाच्या मालकीचे आहेत या आधारावर अर्थव्यवस्थांचे तीन प्रकार केले जातात भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था.

https://t.me/Economics_MPSC

१)भांडवलशाही अर्थव्यवस्था (Cupitalistic Economy)

अर्थः ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजारयंत्रणे करवी उरतात. अश अर्थव्यवस्थेला ‘भांडवलशाही अर्थव्यवस्था’ असे म्हणतात.
२)समाजवादी अर्थव्यवस्था (Socialist Economy)
अर्थः ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी/सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात.
३)मित्र/संमिन अर्थव्यवस्था (Mixed Economy)
अर्थ: भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय मग्रीचा साधण्याचा प्रयत्न प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक करणे, व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते.

मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू-सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच पक्तींना खाजगी क्षेत्रामार्फत घडवून आणले जाते. काही वस्तू- सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असू शकते. भारताने स्वातंत्र्यांनंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्विकार करूनआर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला होता. १९९१ च्या जगी आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवा प्रवास रण मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे.

विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार

अर्थव्यवस्थेचा विकास किती प्रमाणात झालेला आहे त्यानुसार अर्थव्यवस्थांचे दोन प्रकार केले जातातः

https://t.me/Economics_MPSC
विकसित व विकसनशील अर्थव्यवस्था.
१)विकसित अर्थव्यवस्था (Developed economy)

विकसित अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण, मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकीकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर व मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात. यु.एस.ए., यु.के., जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या अर्थव्यवस्था विकसित आहेत.

२)विकसनशील अर्थव्यवस्था (Developing economy)

विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, कमी औद्योगिकीकरण, कृषि क्षेत्राचे प्राबल्य, साक्षरतेचे कमी प्रमाण, लोकसंख्या वाढीचा उच्च दर इत्यादी लक्षणे आढळून येतात.

मात्र ही राष्ट्रे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणून त्यांना ‘अविकसित’ किंवा ‘अल्पविकसित म्हणण्याऐवजी ‘विकसनशील’ किंवा ‘विकासान्मुख’ म्हणणे अधिक उचित ठरते. भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील बहुतेक देश हे विकसनशील देशांच्या गटात मोडतात.

Join our Telegram Channel : https://Telegram.me/Economics_MPSC

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम