चालू घडामोडी : 22 मार्च 2020

154

चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.

Visit Regularly our site to check Current Affairs

Current Affairs : 22 March 2020 | चालू घडामोडी : २२ मार्च २०२०

चालू घडामोडी – आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष अभियानामध्ये समावेश करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

  • केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत योजनेचा एक घटक असलेल्या आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रांचा राष्ट्रीय आयुष आयभियानामध्ये समावेश करण्यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
  • आर्थिक वर्ष 2019-20 ते 2023-24 या कालावधीसाठी आयुष केंद्रांच्या कारभारासाठी  3399.35 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे, ज्यात 2209.58 कोटी रुपये केंद्र सरकारचा वाटा आणि 1189.77 कोटी रुपये राज्य सरकारचा वाटा असणार.
  • अभियानाच्या अंतर्गत आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी खालील उद्दिष्टे साध्य करावी लागणार –
  • विद्यमान सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीसह एकत्रीकरणातून प्रतिबंधात्मक प्रोत्साहन, रोगनिवारक, पुनर्वसन आणि उपशामक आरोग्य सेवा यावर लक्ष केंद्रित करून आयुष तत्वे आणि पद्धतींवर आधारित समग्र निरोगीकरण आदर्श स्थापित करणे.
  • गरजू लोकांना आयुष सेवा उपलब्ध करून माहितीही उपलब्ध करून देणे.
  • आयुष सेवांमध्ये जीवनशैली, मृत्यू, योग, औषधी वनस्पती आणि आयुष प्रणालीच्या सामर्थ्यानुसार निवडलेल्या परिस्थितीसाठी औषधांची तरतूद याविषयी जनजागृती समाविष्ट आहे.

पार्श्वभूमी

  • आयुष (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी / AYUSH) मंत्रालय आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत उप-आरोग्य केंद्रांपैकी 10 टक्के म्हणजेच 12,500 केंद्रे आयुष आरोग्य व निरोगीकरण केंद्रे म्हणून चालविणार असा निर्णय घेण्यात आला असून, ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये एकात्मिक आरोग्य सेवांच्या बहुलवादी प्रणालीत आयुष प्रणालीच्या संभावित शक्यतांना मुख्य प्रवाहात नेण्याचे समर्थन केले आहे.
  • भारत सरकारने फेब्रुवारी 2018 या महिन्यात निर्णय घेतला आहे की सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी विद्यमान उप-आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर करून दीड लक्ष आरोग्य व निरोगीकरण कल्याण केंद्रांची स्थापना केली जाणार

# Current Affairs


चालू घडामोडी – महाराष्ट्र लॉकडाऊन : काय सुरु राहणार आणि काय बंद?

⚡ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तूर्तास 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आाहे.

 काय बंद असेल?

● परदेशातून येणारी वाहतूक बंद.
● मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद.
● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं बंद.
● अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद.
● शाळा, महाविद्यालयं बंद.
● मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद.
● मोठ्या प्रमाणावर कार्यालयं बंद. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सेवा पुरवण्यात याव्यात.
● शासकीय कार्यालयांमध्य फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती.

 काय सुरु असेल?

● जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु.
● धान्य, किराणा मालाची दुकानं सुरु.
● भाजीपाला वाहतूक सुरु.
● औषधांची दुकानं सुरु.
● बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था सुरु.
● वीजपुरवठा कार्यालयं सुरु.

आजपासून 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

# Current Affairs


चालू घडामोडी – राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना निमलष्करी दलाच्या परीक्षेत जादा गुण दिले जाणार??

  • राष्ट्रीय छात्र सेनेत (NCC) देशातल्या अधिकाधिक युवांनी सहभागी व्हावे या हेतूने केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी (CAPF) घेण्यात येणाऱ्या थेट भरती परीक्षेत राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना जादा (बोनस) गुण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

ठळक बाबी

  •  राष्ट्रीय छात्र सेनेचे “अ” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 टक्के जादा गुण, ”ब” प्रमाणपत्र मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 टक्के जादा गुण तर “क” प्रमाणपत्र धारकांना 5 टक्के जादा गुण देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
  •  उपनिरीक्षक आणि हवालदार पदांसाठी आगामी भरती परीक्षा देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रमाणपत्र धारकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
  •  सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या संबधित पोलीस दलांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अशाच प्रकारच्या प्रोत्साहक योजना राबवाव्या अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
  •  सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती होण्यासाठी उत्तमरीत्या प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध तरुण अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यास मदत होणार.
  •  राष्ट्रीय छात्र सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या युवांना शिस्तबद्धता आणि राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भारतीय भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे.
  •  NCCची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.
  •  दरवर्षी NCC कडून मुलगी तसेच मुलग्यांसाठी पर्वतारोहणाच्या मोहिमा आयोजित करते

# Current Affairs


चालू घडामोडी – कलम १४४ लागू झाले सर्वांनी याची नोंद घ्यावी…

  • CRPC १९७३ नुसार कलम १४४ राज्यशासनामार्फत जिल्हादंडाधिकारी/जिल्हाधिकारी यांच्या कडून सार्वजनिक हितासाठी लागू केले जाते…

१४४ नुसार आपण काही नियमांचे पालन करणे अपेक्षित असते त्यानुसार..

  • ४ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमवू शकत नाहीत, बाहेर फिरण्यास प्रतिबंध केला जातो,
  • संविधानातील मूलभूत अधिकार कलम १९ वर यामुळे निर्बंध येतात…
  • तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास भारतीय दंड संहिता (IPC) १८८ नुसार कार्यवाही केली जाते,
  • यासाठी कलम १०७,११६,१५१ CRPC च्या तरतुदीनुसार शिक्षा होऊ शकते…
  • कलम १४४ची वैधताजास्तीत जास्त २ महिने पर्यंत राहु शकते,तसेच राज्यसरकार यात ६ महिने पर्यंत वाढ करू शकते…
  • कायद्याचे यथोचित पालन न झाल्यास ३वर्षापर्यंत (जमानत पात्र) शिक्षा होऊ शकते…

 # Current Affairs


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम