Marathi Varnamala | मराठी वर्णमाला । मुळाक्षरे । व्यंजन । स्वर | 52 वर्ण संपूर्ण माहिती
मराठी वर्णमाला | मुळाक्षरे । व्यंजन । स्वर | 52 वर्ण संपूर्ण माहिती
मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण / मुळाक्षरे [Marathi Varnamala] आहेत व मराठी वर्णांचे एकूण तीन प्रकार पडतात. खाली पूर्ण मराठी वर्णमाला दिली आहे.
Marathi Varnamala : वर्णमाला
तोंडावाटे निघणार्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात.
अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 52 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला (Marathi Varnamala )किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.
मराठी वर्णमालेमध्ये 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने व 2 विशेष संयुक्त व्यंजने हे (क्ष, ज्ञ) आहेत.
मराठी वर्णमाळेमद्धे 14 स्वर +2 स्वादरदी +34 व्यंजने +2 विशेष संयुक्त व्यंजने = असे एकूण 52 वर्ण आहेत.
अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द,
ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
वर्णाचे एकुण तीन प्रकार पडतात
-
स्वर : अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ,
-
स्वरादी : अं, अः
-
व्यंजन : क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
1) [Marathi Varnamala] स्वर :
ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर [swar and vyanjan in marathi] असे म्हणतात.
-
वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.
-
ज्या वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय स्वतंत्र्यपणे होतो त्याला स्वर म्हणतात.
-
ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.
-
मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ,ॲ, ऑ,ओ, औ असे एकूण चौदा स्वर आहेत.
स्वर शब्दात वापरतांना दोन प्रकारे वापरले जाते.
-
अक्षराच्या स्वरुपात
-
चिन्हांच्या स्वरुपात
स्वर |
स्वरचिन्ह |
नाव |
उदा. |
विग्रह |
अ | – | – | क | क् + अ |
आ | ा | काना | का | क् + आ |
इ | ि | र्हस्व इकार | कि | क् + इ |
ई | ी | दीर्घ इकार | की | क् + ई |
उ | ु | र्हस्व उकार | कु | क् + उ |
ऊ | ू | दीर्घ उकार | कू | क् + ऊ |
ऋ | ृ | ऋकार | कृ | क् + ऋ |
लृ | लृ | लृकार | क्लृ | क् + लृ |
ए | े | मात्रा | के | क् + ए |
अॅ | ॅ | अर्धचंद्र | कॅ | क् + अॅ |
ऐ | ै | दोनमात्रे | कै | क् + ऐ |
ओ | ो | मात्रा व काना | को | क् + ओ |
ऑ | ॉ | अर्धचंद्र व काना | कॉ | क् + ऑ |
औ | ौ | दोनमात्रे व काना | कौ | क् + औ |
मात्रा
मात्रा चे वेगवेगळे अर्थ :-
- स्वराचे चिन्ह
- उपाय
- औषधांचे प्रमाण
- वेळेचे परिणाम
- धान्यातील मातीचे खडे
मात्रा :- एखादे अक्षर उच्चारायला लागणार्या वेळेचे परिमाण म्हणजे मात्रा होय.
मात्रांचे दोन प्रकार पडतात –
1) लघुमात्रा – अ, इ, उ, अॅ, ऋ, लृ
2) गुरुमात्रा – आ, ई, ऊ, ओ, औ, ऑ, ए, ऐ
स्वरांचे तीन प्रकार वर्गीकरन केले जाते :-
1) स्वरूपानुसार तीन प्रकार –
-
र्हस्व स्वर
-
दीर्घ स्वर
-
संयुक्त स्वर
2) उच्चारानुसार दोन प्रकार –
-
सजातीय स्वर
-
विजातीय स्वर
3) व्युत्पत्तीनुसार दोन प्रकार –
- सिध्द स्वर
- साधित स्वर
[Marathi Varnamala] स्वरांचे स्वरूपानुसार एकूण तीन प्रकार पडतात :-
1) र्हस्व स्वर :- ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हस्व स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ : अ, इ, ऋ, उ, लृ
2) दीर्घ स्वर :- ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ : आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
3) संयुक्त स्वर :- दोन स्वर मिळून तयार होणार्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
याचे 4 स्वर आहेत.
ए – अ + इ/ई
ऐ – आ + इ/ई
ओ – अ + उ/ऊ
औ – आ + उ/ऊ
स्वरांचे उच्चारानुसार एकूण दोन प्रकार पडतात :-
1) सजातीय स्वर :- एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ : अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
2) विजातीय स्वर :- भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ : अ-ई, उ-ए, ओ-ऋ
स्वरांचे व्युत्पत्तीनुसार एकूण दोन प्रकार पडतात :-
1) सिध्द स्वर : जे स्वर स्वतंत्र, स्वयंभू किंवा मूळ स्वर असतात म्हणजेच त्यांची व्युत्पत्ती इतर स्वरांपासून झालेली नसते, अशा स्वरांना सिध्द स्वर असे म्हणतात.
उदा. र्हस्व स्वर (अ, इ, उ, ऋ, लृ, अॅ)
2) साधित स्वर : मूळ स्वरांपासून बनलेल्या स्वरांना साधित स्वर असे म्हणतात.
उदा. दीर्घ – आ, ई, ऊ, ऑ संयुक्त – ए, ऐ, ओ, औ
2) [Marathi Varnamala] स्वरादी :
ज्याचा वर्णांचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
मो. के. दामले यांनी स्वरदीचा समावेश मराठीत केला.
स्वर + आदी = स्वरादी
दोन स्वरादी : अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
दोन नवे स्वरादी : ॲ, ऑ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
उदा.-
‘अंगण’ या शब्दात अ + अनुस्वार = अं
‘शंकर’ या शब्दात श् + अ + अनुस्वार = शं
‘किंकर’ या शब्दात क् + इ + अनुस्वार = किं
स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात.
-
अनुस्वार
-
अनुनासिक
-
विसर्ग
1) अनुस्वार :- स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार (ॱ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ : गंगा, चंचल इत्यादी.
2) अनुनासिक :- जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात.
उदाहरणार्थ : घरात, जेंव्हा, फुफ्फुसांतील, यांतील, आंतील इत्यादी.
3) विसर्ग :- विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब (:) देतात.
उदाहरणार्थ : स्वत:, दु:ख:, नि:स्पृह: इत्यादी.
3) व्यंजन [swar and vyanjan in marathi]
ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, तालू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार हा अपूर्ण असतो त्यांना उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते त्याला व्यंजने म्हणतात. एकूण व्यंजन 36 आहेत.
– व्यंजने उच्चारावेळी हवेचा मार्ग काहींसा अडवलेला असतो.
– जे वर्ण उच्चारता वेळी दुसर्या वर्णावरती अवलंबून असतात अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात.
**व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
-
स्पर्श व्यंजन (25)
-
अर्धस्वर व्यंजन (4)
-
उष्मा, घर्षक व्यंजन (3)
-
महाप्राण व्यंजन (1)
-
स्वतंत्र व्यंजन (1)
संयुक्त व्यंजन (2)
1) स्पर्श व्यंजन :-
वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, तालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णाला ‘स्पर्श व्यंजने’ असे म्हणतात.
व्यंजन उच्चाराच्या वेळी हवा अडवून जोरात बाहेर टाकली जाते, तेव्हा स्फोट निर्माण होतो, म्हणून त्यांना स्फोट व्यंजन असेही म्हणतात.
स्पर्श व्यंजनाचे 5 वर्ग पडतात म्हणून त्यांना वर्गीय व्यंजने असेही म्हणतात.
क, ख, ग, घ,ड, च,
छ, ज, झ, त्र, ट, ठ,
ड, द, ण, त, थ, द,
ध, न, प, फ, ब, भ, म ही सर्व स्पर्श व्यंजने आहेत.
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते –
-
कठोर वर्ण
-
मृदु वर्ण
-
अनुनासिक वर्ण
१) कठोर वर्ण : ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदाहरणार्थ : क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
२) मृदु वर्ण : ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृदु वर्ण असे म्हणतात.
उदाहरणार्थ : ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
3) अनुनासिक वर्ण : ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक वर्ण असे म्हणतात.
उदाहरणार्थ : ड, त्र, ण, न, म
वर्ग | कठोर व्यंजने | मृदु व्यंजने | अनुनासिके |
‘क’ वर्ग | क्, ख् | ग्, घ् | ङ् |
‘च’ वर्ग | च्, छ् | ज्, झ् | ञ् |
‘ट’ वर्ग | ट्, ठ् | ड्, ढ् | ण् |
‘त’ वर्ग | त्, थ् | द्, ध् | न् |
‘प’ वर्ग | प्, फ् | ब्, भ् | म् |
2) अर्धस्वर व्यंजन-
ज्या व्यंजनांचा उच्चार स्वरांसारखा होतो त्यांना अर्धस्वर असे म्हणतात.
य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चारस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर व्यंजन म्हणतात.
अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.
3) उष्मा, घर्षक व्यंजन-
ज्या वर्णाचा उच्चार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मा, घर्षक व्यंजन असे म्हणतात.
श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात.
4) महाप्राण व्यंजन-
ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण व्यंजन असे म्हणतात.
ख्,घ्,छ,झ्,
ठ,ढ,थ्,ध,
फ,भ्,श्,ष्,स
या वर्णात ह या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लेगते त्या सर्व वर्णाना महाप्राण म्हणातात.
उदाहरणार्थ : ख – kh महाप्राण
अपवाद : स – s महाप्राण
अल्पप्राण व्यंजन
क्,ग्,ङ,च्,
ज्,त्र,ट,ड,
ण्,त्,द,न्,
प्,ब्,म्,य,
र,ल्,व्,ळ,
या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात ‘ह’ ची छटा नसते.
उदाहरणार्थ : ग – g अल्पप्राण,
अपवाद : च – ch अल्पप्राण
5) स्वतंत्र व्यंजन-
ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.
हा वर्ण संस्कृत भाषेत नाही आहे.
ळ पासून सुरू होणारा एकही शब्द नाही आहे.
उदा. बाळ, काळ, कमळ
6)संयुक्त व्यंजन
दोन किवा अधिक व्यंजनांपासून बनलेल्या व्यंजनांना संयुक्त व्यंजन असे म्हणतात.
क्ष्, ज्ञ् या संयुक्त व्यंजंनांचाही आता वर्णमालेत समावेश होतो.
उदा. क्ष = क् + ष्
ज्ञ = द् + न् + य्
[ Marathi Varnamala ] वर्णांच्या उच्चारावरून वर्गीकरण-
1) कंठय वर्ण :-
कंठ म्हणजे गळा. जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागात म्हणजे कंठाला स्पर्श करतात ज्या वर्णाचा उच्चार होतो, त्यांना कंठातून निघणारे म्हणजे ‘कंठय वर्ण’ असे म्हणतात.
अ, आ, अॅ, ऑ हे स्वर ,
क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह् ही व्यंजने
अ: स्वरादी इत्यादी कंठ्य वर्ण आहेत
2) तालव्य वर्ण :-
जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णांचा उच्चार होतात, त्यांना ‘तालव्य वर्ण’ असे म्हणतात.
इ, ई हे स्वर तालव्य वर्ण आहेत.
च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श् हे तालव्य वर्ण आहेत.
3) मूर्धन्य वर्ण :-
कठोर तालू व कोमल तालू (किंवा तालू व कंठ) यांच्या मधल्या भागात ‘मूर्धा’ असे म्हणतात. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेच्या शेंडा या मुर्धेला जाऊन भिडतो, त्यांना ‘मूर्धन्य वर्ण’ असे म्हणतात.
’ऋ’ हा स्वर आणि ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्, ष्, क् ही व्यंजने यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात.
4) दंत्य वर्ण :-
जे वर्ण उच्चारताना आपल्या जेभेचे टोक वरच्या दातांना मागच्या बाजूस टेकते, त्यांना ‘दंत्य वर्ण’ असे म्हणतात.
‘लृ’ हा स्वर आणि त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स् ही व्यंजने ‘दंत्य वर्ण’आहेत.
5) ओष्ठय वर्ण :-
ओष्ठ म्हणजे ओठ. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो, त्यांना ‘ओष्ठय वर्ण’ असे म्हणतात.
‘उ, ऊ’ हे स्वर व ‘प्, फ्, ब्, भ्, म’ ही व्यंजने ओष्ठय वर्ण मध्ये येतात.
6) दंतौष्ठय वर्ण :-
दात आणि ओठ यांचा एकाच वेळी जिभेला स्पर्श होतो त्याला ‘दंतौष्ठय वर्ण’ असे म्हणतात.
व हे व्यंजन या वर्णना मध्ये येते.
7) कंठतालव्य वर्ण :-
कंठ आणि तालव्य यांचा मधून निघणारा वर्ण म्हणजे ‘कंठतालव्य वर्ण’ होय.
ए आणि ऐ हे स्वर कंठतालव्य वर्णात येतात.
8) कंठओष्ठ्य वर्ण :-
कंठ आणि ओष्ठ्य / ओठ यांचा मधून निघणारा वर्ण म्हणजे ‘कंठओष्ठ्य वर्ण’ होय.
ओ आणि औ हे स्वर या वर्णात येतात.
9) दंततालव्य वर्ण :-
कठोर तालूचा दातांकडील फुगीर व खरबरीत असा जो भाग आहे. त्याला ‘वर्त्स’ म्हणतात. हा दात व तालू यांच्यामधील भाग होय. इथे उच्चारल्या जाणार्या ध्वनींना ‘वर्त्स्य ध्वनी’ असे म्हणतात. यांनाच ‘दंततालव्य वर्ण’ असे म्हणतात.
च्, छ्, ज्, झ् या वर्णांना ‘अ’ लावून (पण ‘य’ न लावता) जो उच्चार होतो त्याला दंततालव्य असे म्हणतात.
स्वर |
व्यंजने |
मुखाचा भाग |
वर्णांचा नाव |
अ, आ | क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह् | कंठ | कंठ्य |
इ, ई | च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श् | तालू | तालव्य |
ऋ | ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्, ष्, ळ् | मूर्धा | मूर्धन्य |
लृ | त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स् | दंत | दंत्य |
उ, ऊ | प्, फ्, ब्, भ्, म् | ओष्ठ | ओष्ठय |
ए, | – | कंठ + तालू | कंठतालव्य |
ओ, औ | – | कंठ + ओष्ठ | कंठौष्ठय |
– | व | दंत + ओष्ठ | दंतौष्ठय |
– | च्, छ्, ज्, झ् | दंत + तालू | दंततालव्य |
Marathi Varnamala तालव्य आणि दंततालव्य मधील फरक :-
तालव्य :- च्, छ्, ज्, झ् या वर्णांना ‘य’ लावून जो उच्चार होतो त्याला तालव्य उच्चार असे म्हणतात.
उदा. च्या, ज्य, झ्य
जग , छत्री, चक्र
दंततालव्य :- च्, छ्, ज्, झ् या वर्णांना ‘अ’लावून (पण ‘य’न लावता) जो उच्चार होतो त्याला दंततालव्य असे म्हणतात.
उदा. चमचा, चारा, जावई
अनुनासिक परसवर्ण म्हणून वापरतांना ज्या अक्षरावर अनुस्वार असेल त्या अक्षराच्या पुढील अक्षर गटातील अनुनासिक परसवर्ण म्हणून वापरावे.
अनुस्वार युक्त अक्षरे | अनुस्वाराच्या पुढे येणारे अक्षरे | परसवर्ण |
ं | क ख ग घ | ङ |
ं | च छ ज झ | ञ |
ं | ट ठ ड ढ | ण |
ं | त थ द ध | न |
ं | प फ ब भ | म |
उदा.
रंग = रङग – ङ
चिंच = चित्र्च – त्र
तंटा = घण्टा – ण
भिंत = भिन्त – न
आंबा = आम्बा – म
कधी कधी अर्थभेद करण्यासाठी तत्सम शब्द परसवर्ण वापरुन लिहिली जातात.
उदा.
तत्सम शब्द (अर्थ) | परसवर्ण वापरुन (अर्थ) |
वेदांत (वेदामध्ये) | वेदान्त (वेदांच्याशेवटी) |
सुखांत (सुखात) | सुखान्त (सुखाचा शेवट) |
स्वरांत (स्वरात) | स्वरान्त (शेवटी सुर) |
शालांत (शाळेमध्ये) | शालान्त (शाळेच्या शेवटी) |
अनुस्वाराच्या पुढे य् र् व् ल् श् ष् स् ह् ळ् ज्ञ् आल्यास अनुस्वाराचा उच्चार य, ल, व सारखा होतो त्यास श्रृती होणे असे म्हणतात.
1) अनुस्वाराच्या पुढे ‘य’ हे व्यंजन आल्यास ‘य’ चे द्वित्त होते.
उदा. संयम – संय्यम
2) अनुस्वाराच्या पुढे ‘ल’ हे व्यंजन आल्यास ‘ल’ चे द्वित्त होते.
उदा. संलग्न – संल्लग्न
3) अनुस्वाराच्या पुढे ‘र् व् श् ष् स् ह् ळ् ज्ञ् ’ हे व्यंजन आल्यास अनुस्वाराचा उच्चार ‘व’ सारखा होतो.
उदा. संवाद – संव्वाद, संसार – संव्सार, सिंह – सिंव्ह
हे सुद्धा वाचा :-
-
1) वर्णमाला व त्याचे प्रकार
-
2) मराठी व्याकरण – अक्षर
-
3) मराठी व्याकरण – मराठी वर्णमाला (स्वर / स्वरादी /व्यंजन ) संपूर्ण माहिती
-
4) मराठी व्याकरण – भाषेची ओळख
-
5) नाम व त्याचे प्रकार
-
6) सर्वनाम व त्याचे प्रकार
-
7) संधी व त्याचे प्रकार
-
8) विभक्ती व त्याचे प्रकार
-
9) शब्दसिद्धी व त्याचे प्रकार
-
10) शब्दांच्या शक्ती
marathi varnamala,swar vyanjan in marathi,मराठी वर्णमाला,swar and vyanjan in marathi,marathi swar and vyanjan,वर्णमाला मराठी,varnamala marathi,मराठी वर्णमाला स्वर,वर्णमाला मराठी व्याकरण,मराठी व्याकरण वर्णमाला,
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents