दिनविशेष : १ नोव्हेंबर

129

  १ नोव्हेंबर : जन्म

१८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.

१८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म.

१९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म.

१९२६: संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा पेण येथे जन्म.

१९३२: कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.

१९४०: भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.

१९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.

१९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.

१९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.

१९७३: अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.

१९७४: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.

 १ नोव्हेंबर  : मृत्यू

१८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.

१९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन.

१९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

१९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.

१९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.

१९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

१९९६: श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन.

२००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन.

२००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन

१ नोव्हेंबर : महत्वाच्या घटना

१७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.

१८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.

१८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.

१८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

१८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.

१९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

१९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.


 

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :दिनविशेष : १ नोव्हेंबर

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम