तीन स्वतंत्र परीक्षाऐवजी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा’
आतापर्यंत उमेदवारांना तीन परीक्षांसाठी स्वतंत्र अर्ज आणिशुल्क भरयवे लागत होते. तसेच परीक्षांचा अभ्यासही स्वतंत्रपणेकरावालागतहोता. सर्वसाधारणपणे तीनही परीक्षांसाठी सामाईक उमेदवारांची संख्या मोठी होती. या सर्व बाबीचा साकल्याने विचारकरून आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला.संयुक्त पूर्वपरीक्षा उमेदवारांसाठी सर्वच बाजूंनी सोयीची ठरणार आहे.
– सुनील अवताडे, सहसचिव, एगपीएससी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला आहे.महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल 2021श्मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे.
‘एमपीएससीने संके तस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महसूल आणि वन, कृषि, पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय आणि विकास, मत्स्य
व्यवसाय विभाग, सार्वजनिकबांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट
अ आणि गट ब संवर्गातील भरतीसाठी आयोगाकडून महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृपी सेवा आणि महाराष्ट्रअभियांत्रिकी सेवा यासाठी स्वतंत्र
जाहिरात प्रसिद्ध केली जात होती. तसेच या संवर्गाच्या परीक्षसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या. मात्र तीनही परीक्षांच्या आयोजनाबाबत विविध विविध पैलू चा विचार करून तीनही संवर्गातील भरतीसाठी आता ‘महाराष्ट्र राजपत्रित
तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ ही एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केळे आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते एक, दोन किंवा’तीनही परीक्षांना बसूइच्छितात का, याबाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेलेविकल्प हे संबंधित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील.
त्या आधारे, भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील. पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जातील.
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, पात्रता, वयोमर्यादा,
शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया,परीक्षायोजना,अभ्यासक्रम आदी तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार असल्याची
माहिती आयोगाने दिली.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSCExam’s मराठी नोकरी मार्गदर्शन
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.