दिनविशेष : २५ जानेवारी [राष्ट्रीय मतदार दिवस]

  २५ जानेवारी : जन्म

१६२७: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)

१७३६: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १८१३)

१८६२: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.

१८७४: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)

१८८२: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४१)

१९३८: नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.

१९५८: पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.

२५ जानेवारी  : मृत्यू

१६६५: सोनोपंत डबीर यांचे निधन.

१९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

१९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.

२००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.

२०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)

 २५ जानेवारी  : महत्वाच्या घटना

१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.

१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

१९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

१९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.

१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.

१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.


 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा