व्यक्तीविशेष: नुसरत बद्र

नुसरत बद्र

आपल्या देशात चित्रपटातील अथवा इतरही गाणी लिहिणारांना साहित्यात कवीचा दर्जा देताना काचकूच केली जाते परंतु कवीला किंवा गीतकाराला खरी लोकप्रियता मिळते ती चित्रपटांतील अथवा गैरफिल्मी गाण्यांमधूनच. खरंतर केवळ प्रसिद्धीच नव्हे तर आर्थिक स्थैर्यसुद्धा मिळते.

 उर्दूतील ख्यातनाम शायर बशीर बद्र यांचे चिरंजीव आणि गीतकार म्हणून प्रसिद्धीला आलेले शायर नुसरत बद्र यांना ही लोकप्रियता, स्थैर्य, यश नुकते मिळू लागले होते आणि अकस्मात त्यांना मृत्यूने हाक दिली.

 ‘ये ज़हानत भी कितनी भारी है, इश्क़ की रात कारोबारी है’सारखी दमदार शायरी लिहून नुसरत यांनी शायरांच्या जगात स्थान मिळवले होते. गझल गायक आणि संगीतकार जगजीतसिंग यांनी त्यांच्या काही गझलांना संगीत दिल्यावर त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष गेले आणि चित्रपटसृष्टीतून विचारणा सुरू झाली.

 गीतलेखनाकडे वळले आणि शंभराहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. आदेश श्रीवास्तव, रहमान अशा संगीतकारांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांनी गीतकार म्हणून प्रवेश केला तोच अगदी झोकात. संगीतकार इस्माइल दरबार आणि माँटी शर्मा या दोन्ही संगीतकारांनी देवदास-पारो-चंद्रमुखी या तिघांच्याही भावना व्यक्त करण्यासाठी नुसरत बद्र यांच्या शायरीवर भरवसा ठेवला.

 बद्र यांनी या विश्वासाचे सोने केले आणि कुठल्याही गीतकाराला स्वप्न वाटावे तसे यश, लोकप्रियता त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील गाण्यांना मिळाली. ‘सिलसिला ये चाहत का न हमने बुझने दिया, बैरी पिया, वो चांद जैसी लडकी ही’ सर्व गाणी उत्तम होती, परंतु ‘हमपे ये किसने हरा रंग डाला, ख़ुशी ने हमारी हमें मार डाला’ या सारख्या अगदीच वेगळ्या शब्दरचनेमुळे या गाण्याकडे विशेष लक्ष वेधले गेले.

 शास्त्रीय संगीताचा नेमका वापर असलेले ‘मोरे पिया’ही गाजले. या गाण्यांमुळेच त्यांना पुढे भराभर चित्रपट मिळत गेले. पुन्हा ते यशाच्या शोधात असतानाच त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही. विविध आजारांनी ग्रासले. ‘देवदास’च्या गाण्यांमंधून पुढील अनेक वर्षे त्यांचे मधाळ शब्द आपल्या कानात पाझरत राहतील.

READ  व्यक्तीविशेष :पी. के. बॅनर्जी

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा